पुणे

वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली

CD

वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली
राहुरी, ता. ९ : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसदराच्या मागणीसाठी नगर-मनमाड महामार्गावर आंदोलन होणार असल्याने या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. अहिल्यानगरचे पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.

सोमवारी (ता. ९) सकाळी दहा वाजल्यापासून आंदोलन स्थगित होईपर्यंत नगर-मनमाड मार्गावरील अवजड वाहने, तसेच सर्व प्रकारची चारचाकी वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहेत. नगरकडून राहुरी, शिर्डी, मनमाड, मालेगाव व धुळे दिशेने जाणाऱ्या वाहतुकीसाठी विळद सर्कल -दूध डेअरी चौक -शेंडी बायपास, नेवासा फाटा, कायगाव टोके, गंगापूर, वैजापूर हा पर्यायी मार्ग निश्‍चित केला आहे.
मनमाड कडून कोपरगाव, शिर्डी, राहुरीमार्गे नगरकडे येणाऱ्या वाहतुकीसाठी कोपरगाव-पुणतांबा फाटा-वैजापूर मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे. कमी उंचीच्या वाहनांसाठी कोपरगाव - पुणतांबा- बाभळेश्‍वर -श्रीरामपूर - नेवासा मार्गाचा पर्याय देण्यात आला आहे.

नगरकडून संगमनेर - नाशिककडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी कल्याण बायपास - आळेफाटा -संगमनेर, तर सिन्नर - लोणीमार्गे जाणाऱ्या वाहतुकीसाठी संगमनेर - आळेफाटा हा पर्यायी मार्ग निश्‍चित केला आहे. शासकीय वाहने, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने, तसेच स्थानिक प्रशासनाने आवश्यक कारणास्तव परवानगी दिलेल्या वाहनांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surakumar Yadav: सूर्यकुमार पुन्हा झाला कर्णधार! BCCI च्या T20 स्पर्धेत करणार मुंबईचं नेतृत्व

Amba River Pollution: अंबा नदीचे पाणी शेवाळ आणि केमिकलमुळे प्रदूषित; पालीकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर!

Oil Price: कच्च्या तेलाचे दर आठवडाभरात १७ टक्क्यांनी घसरले; भारतात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

Maharashtra Live News: ‘दिमागी नक्षल’ वक्तव्यावरून राहुल गांधींचे मोदींना पुन्हा चर्चेचे आव्हान

भारतातील एका वर्षाच्या आठवणींनी परदेशी पर्यटक भावुक; 'या देशाने जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला'

SCROLL FOR NEXT