पुणे

नगर तालुक्यातील नजर पैसेवारीची फेरतपासणी करण्याची मागणी

CD

नजर पैसेवारीची फेरतपासणी करा
दिलीप पवार ः तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी
नगर तालुका, ता. ६ ः नगर तालुक्यातील १२१ महसूल गावांची नजर पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक निश्चित करण्यात आल्याने या नोंदींची तत्काळ फेरतपासणी करून दुरुस्ती करावी, अशी मागणी नगर पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नगर तालुका कायम दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यातील विविध गावांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये पाणीटंचाई, चाराटंचाई तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे सुरू असताना नजर पैसेवारीची चुकीची नोंद झाल्याचे निदर्शनास आले आहे.
नगर तालुक्यातील १२१ महसूल गावांची नजर पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त असल्याची आकडेवारी समोर आली आहे. ही आकडेवारी प्रत्यक्ष परिस्थितीशी विसंगत असून, त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दुष्काळी मदतीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. नजर पैसेवारी निश्चित करण्यासाठी कोणती आकडेवारी, निकष व पद्धत वापरण्यात आली, याची माहिती प्रशासनाने जाहीर करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. कागदोपत्री चुकीच्या नोंदीमुळे पात्र शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहू नयेत, यासाठी तहसीलदारांनी गंभीर दखल घेऊन येत्या दोन दिवसांत फेरतपासणी करून सुधारित अहवाल शासनाकडे सादर करावा, अशी त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रशियातील लॅब टेक्निशियनच्या मृत्यूने खळबळ; न्यूमोनिक प्लेगची चर्चा, भारताची चिंता वाढली?

Strait of Hormuz Attack : होर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; ११ भारतीय खलाशी जखमी

Satej Patil Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या बिनविरोधसाठी सतेज पाटलांना ४ जागा?, बंटी पाटलांनी हसत हसत कंडका पाडला

Kalamb Crime : पवनचक्की तार चोरीचा पर्दाफाश; पाच जणांना अटक, ११ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त

Marathi News Live Updates: बारामतीत राष्ट्रवादीकडून 'सोमेश्वर'चा जाहीरनामा प्रसिध्द

SCROLL FOR NEXT