पुणे

नागरगावात अडीच लाखांची तांब्याची कॉईलचा चोरीस

CD

आंधळगाव, ता. १७ : शिरूर तालुक्यातील नागरगाव येथे ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीच्या शेडचे पत्रे उचकाटून अज्ञात चोरट्यांनी २ लाख ४७ हजार रुपयांच्या तांब्याच्या कॉईल चोरी केल्याची घटना शनिवारी (ता. १६) पहाटे घडली. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात चार अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एकनाथ रमेश शेलार (वय ४२, रा. नागरगाव, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे.
शेलार हे त्यांच्या भावासोबत नागरगाव येथे विद्युत रोहित्र दुरुस्तीचे काम करतात. शनिवारी पहाटे दीडच्या सुमारास त्यांना अशोक कोंडे यांनी फोन करून त्यांच्या शेडमध्ये बॅटरीच्या उजेडात संशयास्पद हालचाली होत असल्याचे सांगितले. शेलार यांनी शेडमध्ये झोपलेल्या कामगाराला फोन केला असता पळापळीचा आवाज ऐकू आला. त्यामुळे शेलार, त्यांचे भाऊ संदीप, मयूर शेलार घटनास्थळी गेले. त्यावेळी शेडचे पत्रे आणि कंपाउंडची जाळी कापलेली दिसून आली. पत्रे उचकाटण्यासाठी वापरलेली कटावणी व इतर साहित्य घटनास्थळी पडलेले होते. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तोंडाला फडके बांधलेल्या चार इसमांनी शेडमधून तांब्याच्या कॉईल बाहेर काढल्याचे दिसून आले. सुमारे २२५ किलो वजनाच्या १५ गोलाकार तांब्याच्या कॉईल चोरीस गेल्याचे उघड झाले. घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन; दिला सतर्कतेचा इशारा

Nagpur Vidhan Bhavan Project: नागपूर विधानभवनाचे रूपडे पालटणार; १,००० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, दोन्ही सभागृह येणार एकाच छताखाली

Latest Marathi Live Update : लोणावळ्या कडे जाणाऱ्या रोडवर दरड कोसळली, कातळ धबधबा शेजारची घटना

Maharashtra Rain: पालघरमध्ये मुसळधार! 24 तासांत 134 मिमी पाऊस, जनजीवन विस्कळीत; वाहतूक ठप्प

Navi Mumbai: बटाटावड्यात आढळली अळी, नवी मुंबई महापालिकेच्या भोजनालयातील प्रकार

SCROLL FOR NEXT