नागठाण्यातील विद्यार्थिनीला
२५ हजारांचे पारितोषिक
महाविद्यालयातर्फे आदर्श पुरस्काराने झाला प्रतीक्षाचा गौरव
नागठाणे, ता. २६ : शिक्षण, शिस्त, संस्कार अन् समाजभान यांच्या समन्वयातून ज्ञानाचे धडे गिरविणाऱ्या येथील आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या प्रतीक्षा भरत देशमुख या
विद्यार्थिनीचा २५ हजार रुपयांच्या रोख पारितोषिकाने गौरव झाला.
(कै.) विजयालक्ष्मी अशोक शिंदे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा यंदाचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार देऊन प्रतीक्षाचा सन्मान करण्यात आला. तिला रोख रकमेसह प्रमाणपत्र, चषक प्रदान करण्यात आला. द्वितीय क्रमांकाचा मान गायत्री सुरेश पवार हिने मिळविला. तिला प्रमाणपत्र, चषक व १५ हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले. स्वप्नाली गणेश आवळे हिचा तृतीय क्रमांकाच्या दहा हजार रुपये, प्रमाणपत्र, चषक या पारितोषिकाने गौरव झाला.
पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटचे अतिरिक्त संचालक रोहित अशोक शिंदे यांच्या हस्ते ही पारितोषिके यशस्वी विद्यार्थिनींना प्रदान करण्यात आली. आपल्या प्रेरणादायी मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनात ध्येय निश्चित करून चिकाटीने प्रयत्न करण्याचा संदेश दिला.
प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी दातृत्वाची परंपरा ही समाजाच्या प्रगतीचा पाया असल्याचे सांगत, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळत असल्याचे नमूद केले.
प्रा. डॉ. अजितकुमार जाधव यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. सुरेश पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. विवेक पाटणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. डॉ. राजाराम कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य प्रा. अभय जायभाये यांनी आभार मानले.
या वेळी प्रा. डॉ. अनिल कारंजकर यांच्यासह सर्व प्राध्यापक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोट
माझ्या आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार देण्यामागील उद्देश केवळ गौरव नाही. विद्यार्थ्यांना जबाबदार, कर्तृत्ववान आणि समाजाभिमुख नागरिक बनण्यासाठी प्रेरणा देणे, हा आहे. यश हे केवळ गुणांमध्ये नसते. ते मूल्यांमध्ये, प्रामाणिकपणात आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांत असते. हेच या मुलींनी दाखवून दिले आहे.
- रोहित शिंदे
छायाचित्र ओळी
08214
नागठाणे : रोहित शिंदे यांच्यासह पारितोषिकप्राप्त यशस्वी विद्यार्थिनी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.