पुणे

नागपूर म्हंजे गेम..!

CD

ढिंग टांग२४०८२६

नागपूर म्हंजे गेम..!

- ब्रिटिश नंदी

माझे जेन झी मन अजूनही नागपूरच्या रेशीमबाग मैदानावरच रेंगाळते आहे. काय सुंदर माहौल होता. ‘मंथन फॉर युवा’ कार्यक्रम अतिशय देखणा झाला. आदल्या दिवशी काँग्रेसी राहुलजींनी भाड्याने आणलेल्या गर्दीसमोर पुण्यात पिवळा शर्ट घालून शो केला. (त्या मानाने) आमचा नागपुरी शो एकदम ओरिजिनल होता. ‘जेन झी’च्या भाषेत सांगायचे तर असल्या शोबाजीमध्ये आमचा पक्ष ‘ओजी’ आहे.
मी पिवळा, गुलाबी वगैरे शर्ट घातला नाही. नेहमीचेच जाकीट घातले. छान दिसत होते, असे मला नंतर क्रिकेटपटू तिलक वर्मा म्हणाला. रेशीमबागेत तिलक वर्मा आला, तेव्हा मी त्याला म्हटले, ‘‘तू क्रिकेटपटू आहेस, आणि तिलकही आहेस! यू आर द हिरो!’’ तो काही बोलला नाही. जाऊ दे.
पुणे म्हंजे प्रेम असेल तर नागपूर म्हंजे गेम आहे! आणि असल्या गेममध्ये आम्ही कुणालाही हार जाणे शक्य नाही...
माझे वय छप्पन असले तरीही मी मनाने जेन झीच आहे. ‘जेन झी’ असलो तरी मी बोस्टनचे टीशर्ट घालत नाही आणि नायकेचे जोडेही घालत नाही...आणि अर्थात शिव्याही देत नाही. खरे तर मी नागपुरी आहे. शिव्या ही काही मला नवीन गोष्ट नाही. मनात आणीन तर भल्या भल्या जेन झी लीडरलोकांना मी शिव्यांनी झीट आणीन. नागपुरी हिसका कुणी आजवर ऐकला आहे काय? पण मी त्यातला नाही. रेशीमबागेच्या या मैदानावरच माझे बालपण, तारुण्य आणि सध्याची युवावस्था व्यतीत झाली आहे.
अर्थात काही लोक मला विचारतील की तुम्ही छप्पन्न असाल तर मग ‘जेन झी’ कसे? तर मुळात असा आक्षेप घेणारे लोक असूच शकत नाहीत. कारण काँग्रेसचे बॅटमॅन राहुलजीसुद्धा छप्पन आहेत. मी वयाने त्यांच्यापेक्षा महिनाभराने लहान (की मोठा?) आहे. ते जर ‘जेन झी’ असतील तर मी का नाही? मुळात भारतीय राजकारणात छप्पन म्हंजे ‘जेन झी’च!! यापेक्षा कमी वय असलेल्यांना राजकारणात अलाऊडच नाही. असो.
रेशीमबागेच्या मैदानावर जमा होणारा स्वयंसेवक गंभीर प्रकृतीचा असतो, असा गैरसमज देशभर पसरला आहे. तसे काही नाही. रविवारी तिथे चार हजारांहून अधिक ढोल बडवण्यात आले. पुण्यात ‘छात्रों की गूंज’ झाली, नागपुरात ‘ढोल की गूंज’! ती इतकी गगनभेदी होती की विक्रमच घडला!!
ढोल राहू दे, मला छान छान गाणीसुद्धा म्हणता येतात. अगदी मनात आणीन तर ऑर्केस्ट्रातसुद्धा गाईन. मध्यंतरी माझे गाणे ऐकून मी ‘इंडियन आयडॉल’मध्ये जावे, आणि बक्षीस मिळवून यावे, अशी गळ अनेकांनी घातली होती. पण मीच नको म्हटले!
मी पहिल्यापासूनच भयंकर शूर आहे. वयाच्या अठराव्या वर्षी मी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्यासाठी चाल करून गेलो होतो. बाबरी ढाचा ढासळला तेव्हा गोळी कशी सुसाट जाते, हे प्रत्यक्ष अनुभवणारा मी जेन झी होतो. अशी जेन झी व्यक्ती दबाव अगदी आरामात सहन करू शकते, हे माझ्याकडे बघून इतर जेन झींना सहज कळेल. एका सामान्य कार्यकर्त्याचा मुख्यमंत्री झाला याला कारण आपले संविधान आणि लोकशाही! एक चहावाला प्रधानमंत्री झाला याला कारणही आ. सं. आ. लो.! इतकेच नव्हे तर आमचा हा ‘मंथन फॉर युवा’ शो झाला, यालाही कारण आ. सं. आ. लो.!!
आता आम्ही इतके भरमसाट शो करू की, खुद्द जेन झींनाच कुठून चळवळ केली, असे वाटू लागेल!! आगे आगे देखो होता है क्या!!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: 'चिंचपोकळीच्या चिंतामणी'ला अदाणींची साथ, जाहिरातीसाठी प्रायोजक म्हणून मंडळासोबत करार

IND vs SL 2nd Test: ४०० पार! ध्रुव जुरेल-रिषभ पंत यांचे अर्धशतक; यष्टिरक्षकाने मोडला MS Dhoni चा सर्वात मोठा विक्रम... बनला टॉपर

Narendra Modi Government : राहुल गांधी आणि ‘सीजेपी’चे सरकारपुढे आव्हान

Tamil Nadu LPG Scheme : सरकारचं महिलांना मोठं गिफ्ट ! वर्षाला ३ गॅस सिलिंडर फ्री, डिलक्स बसचा प्रवासही मोफत... मुख्यमंत्र्यांची थेट घोषणा

Pune Bus Accident : पुण्यात बसखाली चिरडून कॉलेज विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू, माणिकबाग परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT