पुणे

वांगी आढावा नागपूर

CD

नागपूर बाजारात ६०० ते १२०० रुपये

ॲग्रोवन वृत्तसेवा
नागपूर : स्थानिक पंडित जवाहरलाल नेहरू मार्केट यार्डमध्ये वांग्याची आवक वाढून ५०० क्विंटलवर पोहोचली असून वाढलेल्या पुरवठ्यामुळे दरांवर काहीसा दबाव असल्याचे चित्र आहे. व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या बाजारात वांग्याचे व्यवहार ६०० ते १,२०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान होत असून सरासरी दर १,०५० रुपये प्रतिक्विंटल नोंदविला जात आहे.
नागपूर जिल्ह्यासह परिसरातील गावांमध्ये भाजीपाला उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. याशिवाय भंडारा जिल्हा भाजीपाला उत्पादनाचा महत्त्वाचा पट्टा मानला जातो. या भागात वांगी, भेंडी, गवार आणि चवळी यांसह विविध भाजीपाला पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असल्याने बाजारात नियमित आवक होत असते. सध्या स्थानिक स्तरावर उत्पादित वांग्याचा पुरवठा वाढल्यामुळे बाजारातील आवकेत लक्षणीय वाढ झाली आहे. शेतकरी स्थानिक बाजारपेठांबरोबरच दर समाधानकारक असल्यास नागपूर बाजारातही माल विक्रीसाठी आणत आहेत. परिणामी बाजारात वांग्याची उपलब्धता वाढली असून व्यवहार सुरळीत सुरू आहेत. व्यापाऱ्यांच्या मते, आगामी काळात आवक याच पातळीवर राहिल्यास दरांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता कमी आहे. मात्र किरकोळ बाजारातील मागणी कायम राहिल्यास सध्याचे दर टिकून राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वांग्याच्या गुणवत्तेनुसार दरात चढ-उतार होत असून दर्जेदार मालाला तुलनेने चांगला भाव मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik News : महाडीबीटीचे पोर्टल अडीच महिन्‍यांपासून ठप्प! सुमारे ७२ शासकीय योजनांचा बोजवारा; विद्यार्थी-संस्‍थाचालकांना मनस्‍ताप

Marathi News Live Updates : हार्बर लोकल पावसामुळे 10-15 मिनिटं उशीराने

Jalgaon News : तरुण उद्योजकाने सात लाखांसाठी संपविले जीवन; सुसाईड नोट लिहून घेतला गळफास

Jalgaon News : ‘उमेद’च्या बळावर जळगावची नारीशक्ती आत्मनिर्भरतेकडे; तब्बल ३१ हजारांहून अधिक बचतगटांचे जाळे, साडेचारशे कोटींहून अधिक कर्ज वितरित

Shiv Sena Supreme Court hearing : कलम १९(c) वरून सुप्रीम कोर्टात खडाजंगी; सिब्बल यांच्या युक्तिवाद, त्यावर न्यायाधीशांचे प्रतिप्रश्न, वाचा नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT