पुणे

नागपूर विश्‍लेषन

CD

नागपूर
भाजपचा विजयाचा चौकार
तुषार पिल्लेवान
नागपूर : नागपूर महापालिकेवर भाजपने विजयाचा चौकार मारला आहे. भाजपच्या विजयात विकासासोबतच ‘लाडक्या बहिणी’ही महत्त्वाचा फॅक्टर ठरला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी हे नेते प्रभावी ठरले आहेत. शहरात विकासाचा झंझावात सुरू असतानाही २०१७ च्या तुलनेत काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ झाली आहे. यंदा काँग्रेसने ‘मिशन १००’चे लक्ष ठेवले होते.
नागपुरातील ३८ प्रभागांतून १५१ नगरसेवक निवडून द्यायचे होते. त्यासाठी ९९३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. तर एकूण २४.८३ लाख ११२ मतदारांपैकी १२ लाख ७५ हजार ९०० मतदारांनी मतदान केले. त्यानुसार ५१.३८ टक्के इतके मतदान झाले. २०१७ मध्ये तर १५१ पैकी एकट्या भाजपचेच १०८ उमेदवार निवडून आले होते. यंदा भाजपने १२० नगरसेवक निवडून आणण्याचे ध्येय निश्‍चित केले होते. त्याअंतर्गत पक्षस्तरावर तीन सर्व्हेच्या माध्यमातून तिकीट वाटप करण्यात आले. यामध्ये भाजपने ५४ हून अधिक माजी नगरसेवकाचे तिकीट कापले. त्यामुळे अनेकांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणूनही रिंगणात उडी घेतली होती. परंतु अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अर्जही मागे घेतले. त्यानंतर सर्व नाराजांवरच भाजपने प्रभागनिहाय निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविली.
कॉंग्रेसने ‘मिशन १००’ चे लक्ष जरी ठेवले असले तरी भाजपच्या तुलनेत काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी ही निवडणूक गंभीरतेने घेतली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे उमेदवारांना स्वबळावर आणि स्थानिक पातळीवरील नेत्यांचीच प्रचारात साथ लाभली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शहराध्यक्ष तथा आमदार विकास ठाकरे यांच्या मोजक्याच सभा-रॅली झाल्या. हे सर्व होऊनही काँग्रेसला ठराविक लक्ष्याच्या निम्म्याही जागा जिंकता आल्या नाहीत. हे विशेष.
‘लाडक्या बहिणीं’ची मिळाली साथ
मतदानासाठी महिलांमध्ये विशेष उत्साह दिसून आला होता.सकाळपासूनच मतदान केंद्रांवर महिलांच्या रांगा दिसून येत होत्या. यामुळे भाजप-शिवसेना महायुतीची ‘लाडकी बहीण’ योजना फायदेशीर ठरणार की परिवर्तनाच्या भूमिकेतून काँग्रेस व इतर पक्षाला कौल मिळणार, याकडे लक्ष लागले होते. परंतु ‘लाडक्या बहिणीं’नी भाजप-शिवसेनेची साथ कायम ठेवल्याचे विधानसभांपाठोपाठ या निवडणुकीतही दिसून आले.
मुख्यमंत्री, गडकरींच्या सभा ठरल्या प्रभावी
निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘तर्री पोहा विथ देवाभाऊ’ उपक्रमाअंतर्गत अभिनेत्री स्पृहा जोशी व हास्य अभिनेते भारत गणेशपुरे यांनी मुलाखत घेतली. तर ‘चना पोहा विथ नितीन गडकरी’ उपक्रमाअंतर्गत अभिनेत्री गिरिजा ओक यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मुलाखत घेतली. याशिवाय मतदानाच्या दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी मध्य नागपुरातून बाईक रॅलीद्वारे मतदारांना साद घातली होती. तसेच मुख्यमंत्री आणि गडकरी यांनी विविध भागात प्रचार सभा घेत भाजपने केलेल्या कामांसोबतच भविष्यात करण्यात येणाऱ्या कामांचा सारीपाट मतदारांपुढे मांडल्याने त्याचाही भाजपला निवडणुकीत फायदा झाला.
विकासाचा फॅक्टर ठरला यशस्वी
नागपुरातील विकासकामांचा निवडणुकीत भाजपला लाभ मिळाला. त्यामुळेच लकडगंज झोनअंतर्गतच्या प्रभाग ४, २३, २४ आणि २५ तसेच हनुमाननगर झोनअंतर्गतच्या प्रभाग २९, ३१, ३२ आणि ३४ या आठही प्रभागातून भाजपचे शतप्रतिशत ३२ उमेदवार निवडून आले.
-----
पक्षीय बलाबल
भाजप - १०१
कॉंग्रेस - ३८
शिवसेना - २
शिवसेना (युबीटी) - २
राष्ट्रवादी कॉंग्रेस - १
एमआयएम - ३
मुस्लीम लीग - ४
-------------------
- प्रथमच एमआयएम, मुस्लिम लीगच्या उमेदवारांचा विजय
-राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष दुनेश्‍वर पेठेंचा प्रभाग २३ मधून पराभव
- माजी आमदार डॉ. मिलिंंद माने यांच्या पत्नी डॉ. सरिता मानेंचा प्रभाग दोनमधून पराभव
- माजी आमदार प्रकाश गजभिये यांचा पराभव
- महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांचा पराभव
- माजी आमदार विकार कुंभारे व अशोक धवड यांच्या पुत्रांनाही चाखावी लागली पराभवाची चव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : महाराष्ट्राच्या राजकारणात एमआयएमची जोरदार मुसंडी विजया जागांचं ठोकलं शतक

BMC Election 2026 Result : मुंबई महापालिका निवडणूक निकालाबाबत ‘साम मराठी’चा 'एग्झिट पोल' ठरला तंतोतंत खरा!

End of the World : जगातलं शेवटचं शहर माहितीये का? जिथे पृथ्वीच संपते..लाखो लोकांना नाही माहिती

निवडणूक नियोजन, तिकीट वाटप ते रणनीतीपर्यंत... महापालिका निकालांत ‘देवेंद्र–रविंद्र’ जोडीचा करिष्मा! केमिस्ट्री ठरली गेमचेंजर

BMC Mayor: मुंबईचा नवा महापौर कोण होणार? भाजपच्या 'या' पाच उमेदवारांच्या जोरदार चर्चा; कुणाला मिळणार संधी?

SCROLL FOR NEXT