पुणे

शेतकऱ्यांचा आक्षेप

CD

ओलिताखालील जमिनींना
कोरडवाहूचा मोबदला

नवीन नागपूर प्रकल्पग्रस्तांचा आक्षेप; पुनर्मूल्यांकनाची मागणी

ॲग्रोवन वृत्तसेवा
नागपूर : नवीन नागपूर प्रकल्पासाठी सुरू असलेल्या जमीन संपादन प्रक्रियेत ओलिताखालील जमिनी सॅटेलाईट सर्व्हेच्या आधारे कोरडवाहू म्हणून नोंदविल्या जात असल्याचा आरोप गोधनी व लाडगाव येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष सिंचन सुविधा असलेल्या जमिनींनाही कोरडवाहू दराने मोबदला मिळत असून शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
माजी जिल्हा परिषद सदस्य धनराज आष्टणकर यांनी पालकमंत्र्यांनी महसूल व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष शेतबांधावर जाऊन पाहणी करावी आणि जमिनींचे पुनर्मूल्यांकन करून योग्य मोबदला द्यावा, अशी मागणी केली. त्यांच्या शेतात विहीर आणि सिंचनाची सुविधा उपलब्ध असूनही जमीन कोरडवाहू म्हणून नोंदविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकरी सुधाकर नरड यांच्या १.६२ हेक्टर क्षेत्रासह अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींचे चुकीचे वर्गीकरण झाल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे प्रकल्पग्रस्तांना अपेक्षित भरपाईपासून वंचित राहावे लागत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
यावेळी ज्ञानेश्वर आष्टणकर, कलावती डुकरे, अक्षय आष्टणकर, नामदेव आष्टणकर, लक्ष्मण वाडीभस्मे, बेबी वाडीभस्मे, रूपाली वाडीभस्मे, प्रकाश नरड, लक्ष्मीकांत नरड, खेमराज भुते, सुधाकर आष्टणकर, गणेश नरड, शुभम नरड, केशव नरड, सुनील उमाळे, नामदेव नरड आणि सुनील भुते उपस्थित होते.
प्रकल्पग्रस्तांनी चुकीचा सर्व्हे करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत, प्रत्यक्ष पाहणी करून योग्य मोबदला निश्चित न झाल्यास प्रकल्पासाठी जमिनी देणार नसल्याचा इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MCOCA: पुण्यात विषारी दारूमुळे २१ जणांचा बळी घेणाऱ्या टोळीवर ‘मकोका’; राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

Daund News : बनावट कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणात दौंडचे नगरसेवक रोहित पाटील यांचे सदस्यत्व रद्द

Food Safety Crackdown: कऱ्हाडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; दोन हॉटेल सील, तीन हॉटेलांवर दंडात्मक हालचाली

Latest Marathi News Live Update : श्रेया कालरा हिने नेटफ्लिक्सचा 'कॅप्टिव्ह' रिअ‍ॅलिटी शो जिंकला

ती सगळ्यांसमोर पाणउतारा करायची... अशोक शिंदेनी सांगितलं सेटवर कशा वागायच्या अलका कुबल; पहाटे साडे पाचला...

SCROLL FOR NEXT