पुणे

अधिवेशनात प्लॅस्टिक बाटल्यांना ‘नो एन्ट्री’

CD

सकाळ विशेष

फोटो ः NGP26I37299 

सकाळ वृत्तसेवा
नागपूर, ता. १६ : ‘एल निनो’च्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने राज्यात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान पाण्याची बचत आणि प्लॅस्टिक कचऱ्याला आळा घालण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच उपाययोजनांना वेग दिला आहे. अधिवेशनाच्या काळात प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांचा वापर पूर्णपणे बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्याऐवजी मंत्री, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी काचेच्या बाटल्यांमधून पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे.
राज्यातील पाणीटंचाईची संभाव्य परिस्थिती आणि जलसाठ्यावरील वाढता ताण लक्षात घेता पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. अधिवेशनासाठी नागपुरात मोठ्या प्रमाणात मंत्री, लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचारी दाखल होतात. त्यांच्या निवासाची तसेच अधिवेशन परिसरातील पाणीपुरवठ्याची व्यवस्था करताना पाण्याचा अपव्यय होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतलेल्या बैठकीत यावर चर्चा झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

काचेच्या बाटल्यांतून पाणीपुरवठा
अधिवेशनाच्या काळात मंत्री, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी तसेच बंगल्यांवर प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांचा वापर केला जाणार नाही. त्याऐवजी काचेच्या बाटल्यांमधून पाणी दिले जाईल. प्लॅस्टिक बाटल्यांचा वापर केल्याने निर्माण होणारा कचरा कमी होण्यासोबतच बाटल्यांमध्ये शिल्लक राहिलेले पाणी फेकून दिल्यामुळे होणारी नासाडीही रोखण्यास मदत होणार आहे. तसेच मंत्र्यांच्या बंगले आणि दालनाबाहेरही २० लिटरचे पाण्याचे जार ठेवण्यात येणार आहे. त्यावर लहान आकाराचे कागदी ग्लास ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मोजकेच पाणी घेता येईल आणि नासाडी थांबणार आहे.

तोतलाडोहच्या जलसाठ्यावर ताण
‘एल निनो’च्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने जलसाठ्यांवर त्याचा परिणाम जाणवत आहे. नागपूर शहराची तहान भागविणाऱ्या तोतलाडोह धरणातील पाणीसाठा दररोज एक टक्क्याने कमी होत असल्याने आगामी काळातील पाणीपुरवठ्याचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे. अधिवेशनादरम्यान शहराच्या पाणीपुरवठ्यावर अतिरिक्त ताण येऊ नये आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा, यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहेत.

प्लॅस्टिक बाटल्यांऐवजी काचेच्या बाटल्यांचा वापर करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार पाण्याची बचत आणि पर्यावरणाचे संरक्षण या दोन्ही उद्दिष्टांचा विचार करून हा निर्णय घेतला आहे.
- संभाजी माने, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latur Politics: विधानसभा पराभवानंतर धीरज देशमुखांचं दमदार कमबॅक; जिल्हा बँकेवर पुन्हा वर्चस्व!

'ठरलं तर मग' बंद करा आता म्हणणाऱ्याला जुई गडकरीनेच दिलं थेट उत्तर! म्हणाली, 'तुम्हाला आवडत नसेल तर...'

Viral Video: गल्ली क्रिकेट, कटिंग चहा अन् मुंबईचा अस्सल अंदाज! सचिन तेंडुलकरने प्रिन्स विल्यम, केट यांना दाखवली मायानगरीची झलक

Latest Marathi News Update : चंद्रपूर जिल्ह्यात बसला भूकंपाचा सौम्य धक्का; ३.२ रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद, कुरली गावाजवळ होता केंद्रबिंदू

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महागमार्ग धाराशिवमध्ये रोखला! सोलापूरमध्ये राजू शेट्टींची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक; आता मोर्चा बारामतीकडे...

SCROLL FOR NEXT