पुणे

30 टक्के पाणीसाठा

CD

४०८ तलावांमध्ये केवळ
३० टक्के पाणीसाठा

मासेमारीसह जिल्हा परिषदेच्या महसुलावरही परिणामाची शक्यता

ॲग्रोवन वृत्तसेवा
नागपूर : पावसाळ्याचे दोन महिने उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने नागपूर जिल्ह्यातील लघुसिंचन तलावांतील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या ४०८ तलावांमध्ये सध्या सरासरी केवळ ३० टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे सिंचनासह तलावांवर अवलंबून असलेल्या मासेमारी व्यवसायाला फटका बसण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या महसुलावरही होण्याची भीती व्यक्त होत आहे.

जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाच्या अखत्यारित जिल्ह्यात ४०८ तलाव आहेत. त्यामध्ये ६० पाझर तलाव, २१४ मामा (माजी मालगुजारी) तलाव आणि १३४ लघुसिंचन तलावांचा समावेश आहे. पावसाळ्यातील अपेक्षित पावसाअभावी यातील बहुतांश तलाव अद्याप पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत. यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने ओढ दिली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत जिल्ह्यात यंदा सुमारे ५० टक्के कमी पाऊस झाल्याचे सांगण्यात येत आहे. कापूस आणि सोयाबीन पिकांची स्थिती तुलनेने समाधानकारक असली तरी पावसाच्या कमतरतेचा धान पिकावर परिणाम जाणवत आहे. त्यातच तलावांमध्ये अपेक्षित जलसाठा न झाल्याने संरक्षित सिंचनाच्या उपलब्धतेबाबतही शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.मागील वर्षी याच कालावधीत जिल्ह्यातील बहुतांश तलाव पूर्ण क्षमतेने भरले होते. काही तलाव ओव्हरफ्लो झाले होते. यंदा मात्र सप्टेंबरची सुरुवात होऊनही सरासरी पाणीसाठा केवळ ३० टक्क्यांवर आहे. सप्टेंबरमध्ये दमदार पाऊस न झाल्यास पुढील काळात सिंचनाच्या नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
-
मासेमारी व्यवसायापुढेही संकट
क्षेत्रफळाने मोठ्या तलावांमध्ये मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जाते. पावसाळ्यानंतर पंचायत समिती स्तरावरून विविध मासेमारी संस्थांना तलाव ठेक्याने दिले जातात. मात्र, पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसल्यास मत्स्य उत्पादन घटण्याची शक्यता आहे. परिणामी मासेमारी संस्थांच्या उत्पन्नावर परिणाम होण्याबरोबरच तलावांच्या ठेक्यातून मिळणाऱ्या जिल्हा परिषदेच्या महसुलालाही फटका बसू शकतो. त्यामुळे सप्टेंबरमधील पावसाकडे शेतकरी, मासेमारी संस्था आणि प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जैन धर्माच्या सणानिमित्त मांसविक्री बंद ठेवा, भाजप नेत्याची मागणी; मनसेचा विरोध

Home Loan: 10 लाखांच्या कर्जावर चक्क 10 लाखांचे व्याज! EMI कमी न करता अशी फेडा लोन; होईल लाखोंची बचत

Panchganga Pollution: एसटीपीची कामे २०२७ पर्यंत पूर्ण करा पंकजा मुंडे यांचे आदेश

Krishna Janmashtami: मथुरा नव्हे, तर 'ही' नगरी असती कृष्णजन्मभूमी? एका आकाशवाणीने बदलला इतिहास! श्रीकृष्ण आणि नेमिनाथ चुलत भाऊ?

Marathi News Live Updates : '‘शरद पवारांनी तेव्हाच मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यायला हवा होता’; मंत्री भरत गोगावले यांचा दावा

SCROLL FOR NEXT