लाचप्रकरणी नागटिळकला
२६ मार्चपर्यंत पोलिस कोठडी
सकाळ वृत्तसेवा
माळशिरस, ता. २४ : लाच स्वीकारल्या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या सुंदरराव नागटिळक यास पोलिसांनी न्यायालयात उभे केले असता, न्यायालयाने त्यास २६ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
याबाबत माहिती अशी की, तक्रारदार यांनी धर्मपुरी येथे सभामंडपाचे काम घेतले होते. ते पूर्ण केले होते. काम पूर्ण झाल्याचा दाखला गटविकास अधिकारी यांच्याकडून मिळवून देण्यासाठी वरिष्ठ सहायक सुंदरराव नागटिळक यांनी तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पंचायत समिती कार्यालयात दुपारी दोनच्या सुमारास तडजोडी अंती दाखला देण्यासाठी पाच हजारांची रक्कम स्वीकारताना नागटिळकला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. हा गुन्हा सोलापूरकडे वर्ग करण्यात आला होता. पोलिसांनी आज (मंगळवारी) सुंदरराव नागटिळक यास माळशिरस न्यायालयात हजर केले असता, त्याला न्यायालयाने २६ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या खटल्यात सरकारी वकील म्हणून ॲड. पी. एस. मेंढेगिरी यांनी काम पाहिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.