पुणे

रणजितसिंह नाईक-निंबाळकर प्रेस

CD

नाईकबोमवाडीतील उद्योगामुळे हजारो रोजगार

रणजितसिंह नाईक-निंबाळकर; उद्योगमंत्री वाईट लोकांच्या संगतीत

फलटण, ता. ३ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाईकबोमवाडी एमआयडीसीत मोठा उद्योग आणण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे तालुक्यातील १० ते २० हजार युवकांच्या हाताला रोजगार मिळणार असताना रामराजे व त्यांच्या बंधूंच्या पोटात का दुखते. विधान परिषदेचे सभापती असताना त्यांनी केवळ राजकीय आकसातून एमआयडीसी प्रकल्प रद्द करण्याच्या बैठका घेतल्या, असा आरोप माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केला.
सुरवडी (ता. फलटण) येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार सचिन पाटील, जिल्हा बँकेचे संचालक व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर, ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे पाटील उपस्थित होते.
रणजितसिंह म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात उदय सामंत उद्योगमंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्यास त्याबाबत कनिष्ठ मंत्र्यांना विचारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. दावोस येथील आंतरराष्ट्रीय परिषदेतून परतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः मला दूरध्वनीवरून नाईकबोमवाडी एमआयडीसी प्रकल्पाबाबत माहिती दिली होती. या प्रकल्पाबाबत उद्योगमंत्र्यांना काही शंका असतील तर त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी समक्ष चर्चा करावी. खुद्द मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाबाबत जाहीरपणे स्पष्ट भूमिका मांडली आहे.’’
शिवरूपराजे खर्डेकर म्हणाले, की ज्या पवार कुटुंबीयांनी रामराजेंना कायम सत्तेच्या केंद्रस्थानी ठेवले, पक्षविरोधी काम करूनही आमदारकी अबाधित ठेवली, त्यांच्याच बाबतीत कृतज्ञता विसरली गेली. अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड होत असताना त्या बैठकीला गैरहजर राहून रामराजे साखरवाडीत शिवसेनेचा प्रचार करत होते, असा आरोपही खर्डेकर यांनी केला.
प्रल्हाद साळुंखे पाटील म्हणाले, की सुरवडी एमआयडीसीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी देण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेतला होता. कोणताही त्रास न होता हा प्रकल्प मार्गी लागला. तत्कालीन जिल्हाधिकारी ओमप्रकाश गुप्ता यांनी माझ्या सहकार्याबद्दल काळभैरव मंदिरात येऊन माझा सन्मान केला होता. स्वतःला एमआयडीसीचा जनक म्हणवणाऱ्यांचा या प्रक्रियेशी काहीही संबंध नाही, तसेच कमिन्स कंपनी ही केवळ शरद पवार यांच्या कृपेमुळेच फलटणला आली, असा दावाही त्यांनी केला.

फोटो- रणजितसिंह नाईक-निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: भारताच्या पहिल्या सामन्यासाठी संजू सॅमसनला संधी, तर इशान किशन, कुलदीप यादव प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर

Lonavala: दुर्गा श्वानामुळे सापडला ४०० फूट खोल दरीतला मृतदेह; ड्रोन तंत्रज्ञानाचीही झाली मोठी मदत

Paschim Maharashtra Temple Recruitment 2026: पश्चिम महाराष्ट्रातील मंदिरांसाठी लवकरच भरली जाणार नवी पदे; बक्कळ पगार अन् मिळणार ही सुविधा

Latest Marathi News Live Update : पुण्यातील विमाननगर परिसरात जोरदार राडा

कोण्या दिग्गज व्यक्तीने नाही तर 'या' माणसाने दादा कोंडकेंना दाखवली पांडू हवालदार सिनेमातील मोठी चूक

SCROLL FOR NEXT