पुणे

नाकाबंदी होतीये आणखी कडक; कारण...

गणेश बोरुडे

तळेगाव स्टेशन : महिनाभराहून अधिक काळ चालू असलेल्या कोरोना लॉकडाऊन दरम्यान नागरिकांच्या बेफिकीरीने वैतागलेल्या बंदोबस्तावरील पोलिसांना गुरुवार (ता.३०) पासून ३५ अधिकृत पोलिस मित्रांची साथ मिळाल्याने तळेगावातील नाकाबंदी आणखी कडेकोट झाल्याचे चित्र आहे.

नगरपरिषद मुख्याधिकारी दीपक झिंजाड, पोलिस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण कानडे या त्रिमूर्तींच्या समन्वयामुळे तळेगाव दाभाडे शहर आजपर्यंत कोरोनामुक्त असल्याने नागरिक काहीसे निश्चिंत आहेत. मात्र, नानाविध कारणांखाली विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या बेशिस्तांना जाब विचारताना आवर घालताना पोलिसांना चांगलाच थकवा आला होता. मात्र, दोन दिवसांपासून सक्रीय झालेल्या ३५ पोलिस मित्रांमुळे तो आता दूर झाला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

तळेगावातील समाजसेवी वृत्तीच्या युवकांची चारित्र्यपडताळणी करुन 'पोलिस मित्र' बिल्ले देण्यात आले आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने लिंब फाटा येथील मुख्य प्रवेशद्वार बंद केल्याने तेथील बंदोबस्त जिजामाता चौक, मराठा क्रांती चौकासह इतर महत्त्वाच्या ठिकाणी वळवण्यात आला आहे.

मराठा क्रांती चौकात कडक तपासणी होत असल्याने स्टेशन भागात मोकाट फिरणाऱ्यांचा वावर कमी झाला आहे. यापुढे लॉकडाऊन असेपर्यंत दुपारी एकनंतर विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे म्हणाले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पोलिस मित्रांचे सहकार्य तपासणीसाठी लाभत असल्यामुळे नाकाबंदी सहजासहजी तोडून जाणे जिकीरीचे बनले आहे, असे पोलिस मित्र टीमचे मुख्य समन्वयक महेश महाजन, ब्रिजेंद्र किल्लावाला आणि दिलीप डोळस यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SSC HSC Exam Time Table : दहावी-बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील शिवाजीनगर न्यायालयात हजर; नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याच्या आरोप

Maharashtra School: राज्यात देशभक्तीचा सूर घुमणार! सर्व शाळांमध्ये ‘वंदे मातरम’ गीत बंधनकारक, महायुती सरकारचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : सीबीआय अधिकाऱ्यांच्या १२ सदस्यांच्या पथकाने चेंगराचेंगरीच्या ठिकाणी जाऊन तपासणी केली

Aadhaar Card Update Fees : महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून आधारकार्ड अपडेटसाठी शुल्कात झाला बदल

SCROLL FOR NEXT