Nal-Stop-Chowk 
पुणे

नळस्टॉप चौकाजवळ आणखी एक प्रयोग

सकाळवृत्तसेवा

पुणे - म्हात्रे पूल, मेहेंदळे गॅरेज, निसर्ग हॉटेलकडून येणाऱ्या वाहनांना पाडळे पॅलेस चौकातून उजवीकडे वळण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे या वाहनांना पाडळे पॅलेस चौकाऐवजी नळस्टॉप चौकातून यू टर्न घेऊन गरवारे महाविद्यालय, सेंट्रल मॉल, नवी पेठ किंवा डेक्कन परिसरात जाता येईल. हा बदल प्रायोगिक स्वरूपात असून, त्याची अंमलबजावणी सोमवारपासून (ता. २७) होणार आहे.

खडकवासला धरणातून विसर्ग वाढविल्याने रजपूत झोपडपट्टी ते डेक्कनदरम्यानच्या नदीपात्रातील रस्त्यावरील वाहतूक बंद केली आहे. त्यातच कर्वे रस्त्यावर मेट्रो पुलाचे काम सुरू आहे. या दोन्ही कारणांमुळे म्हात्रे पूल, मेहेंदळे गॅरेज, पाडळे पॅलेसपासून ते नळस्टॉपपर्यंत वाहतूक कोंडी होत आहे. या पार्श्‍वभूमीवर सोमवारपासून येथील वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. यासाठी वाहतूक शाखेतील सहायक आयुक्त प्रभाकर ढमाले, नगरसेवक मंजुश्री खर्डेकर, माधुरी सहस्रबुद्धे, दीपक पोटे, जयंत भावे, पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी, महापालिकेच्या पथविभागाचे मुकुंद शिंदे, राजेश फटाले, भाजप शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी नुकतीच पाहणी करून बदलाची अंमलबजावणी कशी करायची, याचे नियोजन केले.

वाहनचालकांनी पाडळे पॅलेस चौकातून वळण्याऐवजी नळस्टॉप येथून वळून खिलारेवाडी, सेंट्रल मॉल व गरवारे कॉलेजकडे जाता येईल. त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी कमी होईल.
- प्रभाकर ढमाले, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Delay Maharashtra : आधी 11, मग 15 अन् आता थेट...; महाराष्ट्रात 'या' तारखेला मान्सून सक्रिय होणार! हवामान खात्याचा नवा अंदाज, यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस?

TMC कुणाची? बंडखोर पक्षाच्या नावासह चिन्हावर दावा करणार; शिवसेना, राष्ट्रवादीच्या वाटेवर ममतांचा पक्ष

Sanchita Ugale: छावा चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्रीने संपवलं जीवन, नालासोपाऱ्यातील राहत्या घरात आढळला मृतदेह; DDLJ मध्येही काम केलं होतं

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईत अधिकाऱ्यासमोर शिवसैनिकांनी निमंत्रण पत्रिका फाडली

IND A vs SL A: दुष्काळात तेरावा महिना! विपराज निगमच्या चुकीचा फटका; भारताच्या धावा ICCने कमी केल्या, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT