saurabh-rao sakal
पुणे

Pune News : पुणे जिल्ह्यातील मोठ्या गावांत नमामि चंद्रभागा अभियान; ३३ गावांची निवड

पुणे जिल्ह्यातील मोठ्या गावांमध्ये नमामि चंद्रभागा अभियान राबविण्याचा आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे जिल्ह्यातील मोठ्या गावांमध्ये नमामि चंद्रभागा अभियान राबविण्याचा आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिला आहे.

पुणे - पुणे जिल्ह्यातील मोठ्या गावांमध्ये नमामि चंद्रभागा अभियान राबविण्याचा आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिला आहे. या अभियानासाठी जिल्ह्यातील नदीकाठच्या किमान दहा हजार लोकसंख्या असलेल्या ३३ गावांची निवड करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये भीमा, भामा, इंद्रायणी, पवना, मुळा, मांडवी, कुकडी, वेळ, मुळा-मुठा आदी नद्यांच्या काठावरील गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये नदीपात्राच्या शेजारी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.

नमामि चंद्रभागा या प्रकल्पासाठी दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी आणि शिरूर या आठ तालुक्यांतील गावांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्यावतीने या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येकी ५० टक्के निधी उपलब्ध करून देणार आहे. तसेच पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचाही वापर करता येणार आहे. शिवाय या प्रकल्पासाठीचे गाव आणि प्रकल्पनिहाय प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून, या प्रकल्प अहवालांना तांत्रिक मान्यता घेण्याचा आदेश या तालुक्याच्या सर्व गट विकास अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.

या प्रकल्पासाठी कोरेगाव भीमा, मांडवगण फराटा, शिक्रापूर, सणसवाडी व तळेगाव ढमढेरे (सर्व ता. शिरूर), राहू, पाटस, कुरकुंभ, यवत, केडगाव, वरवंड (सर्व ता. दौंड), भिगवण, पळसदेव (ता. इंदापूर), पेरणे, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, उरुळीकांचन, कुंजीरवाडी (ता. हवेली), नारायणगाव, वारूळवाडी, ओतूर (ता. जुन्नर), नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, खराबवाडी, कडुस (ता. खेड), खडकाळे, इंदोरी, सोमाटणे, वराळे (ता. मावळ) आणि पिरंगुट, हिंजवडी, माण, भूगाव (ता. मुळशी) या गावांची निवड करण्यात आली आहे.

गाव निवडीचे निकष

- गावाची लोकसंख्या किमान दहा हजार अनिवार्य

- गाव नदीकाठावर असावे

- प्रकल्पासाठी नदीकाठावर पुरेशी जमीन उपलब्ध असावी

- उपलब्ध जमीन ही पूरक्षेत्राच्या बाहेर असणे बंधनकारक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Rajapur Tragedy : नाणारमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत कालवे काढण्यासाठी गेलेली एकाच घरातील ४ भावंडे बुडाली; तिघांचे मृतदेह हाती

SCROLL FOR NEXT