Name changed of Pune University to Savitribai Phule Pune University 
पुणे

सावित्रीबाई फुले : असे झाले पुणे विद्यापीठाचे नामकरण!

सकाळ वृत्तसेवा

इ.स. २००४ साली नामांतर समिती आणि विविध पक्षांनी विद्यापीठाचे आधीचे नाव बदलून सावित्रीबाई फुले विद्यापीठ करावे अशी मागणी केली. यासाठी नामांतर समितीने वेळोवेळी आंदोलने केली. विद्यापीठात झालेल्या अधिसभेत सिनेटने नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. हा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य सरकारकडे पाठवण्यात आला. पुणे विद्यापीठाच्या नावाशी, स्त्रीशिक्षणासाठी आपले आयुष्य वेचलेल्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले यांचे नाव जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. ७ जून २०१४ मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालं.

अखेर पुणे विद्यापीठाचे झाले नामकरण
माजी राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या उपस्थितीत 9 ऑगस्ट 2014मध्ये पुणे विद्यापीठाला अखेर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असा नामविस्ताराचा समारंभ पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, छगन भुजबळ, अजित पवार आदी नेते उपस्थित होते. यापुढे पुणे विद्यापीठ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या नावाने ओळखले जाईल. 

पुणे विद्यापीठाच्या अधिसभेत जानेवारी महिन्यात पुणे विद्यापीठाचा ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’, असा नामविस्तार करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला होता. अनेक वर्षांपासून विद्यापीठाचे नामांतर करण्याची मागणी नामांतर कृती समितीतर्फे केली जात होती.

यानंतर सरकारने नामविस्ताराचा ठराव मंजूर केला होता, तसा अध्यादेश काढला होता. त्यानंतर लागलीच नामविस्ताराचा समारंभ आयोजित करून नामविस्तार करण्यात आला आहे.

पुणे विद्यापीठाचे नाव बदलून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ का ठेवण्यात आले?

विद्यापीठाचे नामांतरण ही महाराष्ट्रासाठी किंबहुना भारतासाठी नवीन गोष्ट नाही. नवीन विद्यापीठाच्या घोषणेनंतर साधारणपणे त्या शहराचे किंवा भौगोलिक नाव देण्यात येते. कालांतराने ठराविक समाजाची मागणी किंवा आंदोलनाची दखल घेऊन नामांतर केले जाते.

सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी १८४८ साली भिडे वाडा येथे सुरु केलेल्या शाळेने स्त्रियांना शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त केले. त्या काळच्या समाजात स्त्रियांना नवयुगाची पहाट दाखवणाऱ्या सावित्रीबाईंंसारख्या असामान्य व्यक्तीमत्वाचे नाव २०१४ साली पुणे विद्यापीठला देऊन विद्यापीठाचा गौरव केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : काय चाललंय? धबधब्याखाली दोन मुले आक्षेपार्ह अवस्थेत, लोकांच्या माना लाजेने खाली, सार्वजनिक ठिकाण तरी सोडा रे...

Chakan MIDC : चाकण एमआयडीसी परिसरात वर्तुळाकार बससेवा, पीएमपी प्रशासनाचा निर्णय; अध्यक्षांकडून पाहणी

Vlogger of the Year: लोहार यांचा व्लॉगर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान

Indrayani River : ‘इंद्रायणी-पवना सुधार’ निविदेसाठी सल्लागार, चार महिन्यांत कार्यवाहीनंतर काम सुरू होणार; ‘पीएमआरडीए’ची माहिती

Solapur: डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणी डॉ. उमा वळसंगकरांचा मनीषा मानेंविरुद्ध नवा अर्ज; आर्थिक अपहारप्रकरणी गुन्हा दाखल करा

SCROLL FOR NEXT