Name-Plate 
पुणे

#NamePlate लोकप्रतिनिधींची अशीही ‘नगर’सेवा! (व्हिडिओ)

अमर सदाशिव शैला

पुणे - सामान्य जनतेच्या कराच्या पैशांतून लोकप्रतिनिधींनी आता चमकोगिरीला सुरवात केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सहकारनगर-पद्‌मावती परिसरात एक नव्हे, सुमारे ५०० बंगल्यांना पालिकेच्या पैशांतून पाट्या लावण्यात आल्या आहेत. कहर म्हणजे काही घरांबाहेर नागरिकांनी त्यांच्या नावाच्या पाट्या लावलेल्या असतानाही त्याच्या खालीच पाट्या लावण्यात आल्या आहेत.

धनकवडी क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रमांक ३५ मध्ये नगरसेवकांमध्ये बंगल्यांबाहेर पाट्या लावून देण्याची चढाओढ आहे. एका नगरसेवकाने घराच्या भिंतीवर पाट्या लावून दिल्यानंतर दुसऱ्या नगरसेवकाने रस्त्याच्याकडेला लोखंडी खांब उभारून त्यावर पाटी लावून दिली. पाट्या लावलेल्या प्रत्येक बंगल्याची किंमत जवळपास १ कोटी असताना त्यांच्यासाठी या पाट्यांची गरज होती का, असा सवाल आहे.         

आपला प्रचार होण्यासाठी या पाट्यांवर नगरसेवकांनी स्वतःची नावेही टाकून घेतली. ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या उधळपट्टीला आक्षेप घेतला आहे. याबाबतचे निवेदन धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाला दिले आहे. पाट्यांवर जवळपास १० लाख रुपयांची उधळपट्टी करण्यात आली. चौकांच्या नावांसाठी वापरण्यात येणारे खांबही पाट्यांसाठी वापरले आहेत.

चमकोगिरीसाठी सामान्यांच्या पैशांची उधळपट्टी केली जात आहे. करदात्यांच्या पैशाच्या अपव्ययाला जबाबदार अधिकाऱ्यांवर आणि नगरसेवकांवर कारवाई केली जावी; तसेच त्यांच्याकडून ते पैसे वसूल करावेत. 
- फारुख शेख, सामाजिक कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सला धक्का! वैभव शतकानंतर फिल्डिंग करताना लंगडत गेला मैदानातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT