पुणे

आगामी ‘शक्ती शालिनी’, ‘ईठा’तून दिसणार नाना

CD

मुंबई, ता. ८ (वृत्तसंस्था) ः अभिनेते नाना पाटेकर यांचे आज आकस्मिक निधन झाल्याने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. आगामी पाच चित्रपटांतून त्यांचा दमदार अभिनय प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
भय व विनोदीपट, चरित्रपट, महोत्सवातील चित्रपट आणि हलकीफुलकी प्रेमकथा अशा विविध प्रकारच्या आगामी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.
आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘शक्ती शालिनी’ हा भय व विनोदीपट आहे. मॅडॉक फिल्म्सच्या या चित्रपटात पाटेकर यांच्यासह अनीत पड्डा आणि विशाल जेठवा यांच्याही भूमिका आहेत. मे २०२६मध्ये त्यांनी या चित्रपटाच्या मुंबईतील चित्रीकरणात सहभाग घेतला होता.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘ईठा’ या चरित्रपटातही नाना पाटेकर दिसणार आहेत. महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोकनाट्य आणि लावणी कलावंतांपैकी एक असलेल्या विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. श्रद्धा कपूर प्रमुख भूमिकेत असून, रणदीप हुडा, अनंत जोशी यांच्याही भूमिका आहेत. ‘ईठा’ चार डिसेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

टोरांटोत प्रिमियर
दिग्दर्शक अनंत नारायण महादेवन दिग्दर्शित ‘द कन्फेशन ऑफ मेरी’ या चित्रपटातही नाना पाटेकर यांची भूमिका आहे. १९६६मध्ये झालेल्या मरियाकुट्टी या कॅथलिक महिलेच्या हत्येवर हा चित्रपट आधारित आहे. यात आदिल हुसेन, आशिष विद्यार्थी, गौतम रोडे, जॉय सेनगुप्ता, नेहा महाजन आणि पंखुडी अवस्थी यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाचा प्रीमियर टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणार आहे. शरण शर्मा दिग्दर्शित ‘कुकू की कुंडली’ या चित्रपटातही नाना पाटेकर यांच्यासह भुवन बाम आणि वामिका गब्बी यांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाची अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. राजेश्वर पांडे राज दिग्दर्शित ‘वेदांता’ या चित्रपटातही नाना पाटेकर दिसणार आहेत. संदीपा धर, विक्रांत मॅसी आणि मुकेश तिवारी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR voter list: देशातील 42 निवृत्त न्यायमूर्तींचं खुलं पत्र! SIR वरुन सुरु असलेल्या वादावर स्पष्ट केली भूमिका

India Alliance Protest : 'देश हायजॅक केलाय, लोकशाहीची हत्या सुरूय'; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, आंदोलनासाठी 300 खासदार राजघाटावर

NANA PATEKAR: नाना पाटेकर रोज ६० सिगारेट ओढायचे; वयाच्या ५६व्या वर्षी सोडली सवय, पण हृदयाला झालेलं नुकसान भरून निघतं का? जाणून घ्या

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीचे खासदार राजघाटावर

Nana Patekar Death : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे Cardiac Arrest ने निधन; हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्टमध्ये काय फरक असतो? शरीरात नेमकं काय घडतं?

SCROLL FOR NEXT