व्हिएन्ना, ऑस्ट्रीया - ‘ग्लोबल झिरो प्रोजेक्‍ट इनोव्हेशन प्रॅक्‍टिस ॲवॉर्ड’ स्वीकारताना प्रा. कविता मुरुगकर. 
पुणे

नानावटी आर्किटेक्‍ट महाविद्यालयाचा संयुक्त राष्ट्राकडून गौरव

सकाळवृत्तसेवा

पुणे - डॉ. भानूबेन नानावटी आर्किटेक्‍ट महाविद्यालयाच्या युनिव्हर्सल डिझाईन सेंटरला (यूडीसी) संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने गौरविण्यात आले. दिव्यांगासंबंधी केलेल्या कार्याबद्दल युनोच्या व्हियेन्ना येथील मुख्यालयात ‘ग्लोबल झिरो प्रोजेक्‍ट इनोव्हेशन प्रॅक्‍टिस ॲवॉर्ड’ने संस्थेला गौरविण्यात आले. 

महाविद्यालयाच्या प्रा. कविता मुरुगकर यांच्या नेतृत्वाने आणि प्राचार्य डॉ. अनुराग कश्‍यप यांच्या मार्गदर्शनाखाली २०१४ मध्ये या केंद्राची सुरवात करण्यात आली आहे. समाजातील दिव्यांगांची क्षमता विकास करण्यासाठी त्यांना वास्तुविशारदाचे कौशल्ये प्राप्त व्हावे, यासाठी संस्थेच्या वतीने त्यांच्यासाठी प्रशिक्षणाचे कार्यक्रम राबविण्यात येतात. एस्सेल फाउंडेशनच्या वतीने जागतिक स्तरावर दिव्यांगांच्या प्रगतीसाठी कार्य करणाऱ्या संस्थेचा २००८ पासून गौरव करण्यात येतो. संयुक्‍त राष्ट्र संघाने निश्‍चित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांवर दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेची अथवा व्यक्तीची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. या वर्षी १०६ देशांतून ५०० संस्थांना झिरो प्रोजेक्‍ट ॲवॉर्डसाठी मानांकन प्राप्त झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune-Kolad Road Accident : पुणे-कोलाड मार्गावर लवळे फाट्याजवळ भीषण अपघात; सिमेंटच्या ट्रकने कार-दुचाकींना उडवले, एकजण जागीच ठार, दोघे गंभीर

प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवा ट्विस्ट! गोळी आरोपीलाही लागल्याची शक्यता, एसआयटीकडून पुरावे संकलित

मुंबईत आंदोलन करणं CJPला महागात पडलं! अभिजीत दिपकेंसह सर्व आंदोलकांवर गुन्हा दाखल, पोलिसांची कडक कारवाई

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

Sarva Pitri Amavasya 2026: यंदा सर्वपित्री अमावस्या कधी आहे? जाणून घ्या शुभ तिथी, तर्पण मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT