पुणे

अभिलाषा वाघमारे हिला पुरस्कार प्रदान

CD

धावपटू अभिलाषा वाघमारेचा गौरव

नंदा जाधव प्रतिष्ठानच्या वतीने स्मृती पुरस्कार प्रदान

सातारा, ता. २८ : आंतरराष्ट्रीय धावपटू नंदा जाधव यांच्या २७ व्या स्मृतिदिनानिमित्त (कै.) नंदा जाधव प्रतिष्ठानच्या वतीने नवोदित धावपटू अभिलाषा वाघमारे हिला डॉ. संदीप काटे व पालिकेचे उपाध्यक्ष दत्ता बनकर यांच्या हस्ते नंदा जाधव स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी आयोजिलेल्या रक्तदान शिबिरात १४० जणांनी रक्तदान केले.
डॉ. काटे म्हणाले, ‘‘नंदा जाधव ही साताऱ्यातील पहिली आंतरराष्ट्रीय धावपटू होती. तिच्या स्मृतिप्रीत्यर्थ या परिसरात एक क्रीडा संकुल उभारण्यात यावे. रनर फाउंडेशनच्या माध्यमातून मॅरेथॉनविषयक एक कायमस्वरूपी दालन उभे करण्याचा मानस असून, त्यात नंदा जाधवने मिळवलेल्या विविध पुरस्कारांचे जतन करून भावी व नवोदित खेळाडूंना त्यापासून प्रेरणा मिळेल.’’
खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सातारा व आसपासच्या परिसरात क्रीडा क्षेत्राला पूरक असे मैदान उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नंदा जाधवचे कर्तृत्व मी लहानपणापासून पाहिले आहे. तिच्या स्मृतिप्रीत्यर्थ क्रीडा संकुल होण्यासाठी मी निश्चित पाठपुरावा करीन, असे आश्वासन उपाध्यक्ष ॲड. बनकर यांनी दिले.
प्रतिष्ठानचे सचिव सुरेश साधले यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष टी. आर. गारळे व आनंदराव कणसे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. श्रीकांत देशमुख यांनी आभार मानले.
कार्यक्रमास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रवीण जाधव, संभाजीनगरचे सरपंच सतीश माने, उपसरपंच काशिनाथ गोरड, नितीन पाटील, सुजित चावरे, महेश कदम, गिरीश ढेंबरे, उमेश कांबळे, राम कदम, राजेंद्र कामटे, ॲड. सागर जाधव, संजय गायकवाड, महेश जाधव, रमेश हलगेकर, अमोल तांगडे, महेश गडकरी, एचडीएफसी बँकेचे श्री. कुलकर्णी, अर्चना देशमुख, हेमंत शिदे, किशोर मोरे, श्री. जगदाळे आदी उपस्थित होते.
--------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावती शिक्षक मतदारसंघाचा निकाल जाहीर! किरण सरनाईक सलग दुसऱ्यांदा विजयी, काँग्रेसच्या अदिती पोहरेंचा पराभव

Spain Train Accident: स्पेनमध्ये भीषण अपघात; २ हाय-स्पीड रेल्वेगाड्यांची धडक; ३० जणांचा मृत्यू

Supreme Court Recruitment: सुप्रीम कोर्टात नोकरीची संधी! 'कोर्ट मास्टर' पदासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची दिवाळी भेट! किती टक्क्यांनी वाढला महागाई भत्ता?

Marathi News Live Updates : अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे किरण सरनाईक विजयी; काँग्रेसच्या अदिती पोहरे यांचा पराभव!

SCROLL FOR NEXT