पुणे

नांदेडला आज, उद्या उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी

CD

नांदेड आज, उद्या उष्णतेच्या
लाटेचा यलो अलर्ट जारी

नांदेड जिल्ह्यासाठी गुरुवारी व शुक्रवारी हवामान खात्याचा इशारा

ॲग्रोवन वृत्तसेवा
नांदेड : मुंबईच्या प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी गुरुवारी व शुक्रवारी (ता. १४ व १५ मे) हे दोन दिवस येलो अलर्ट जारी केलेला आहे. या दोन दिवसांच्या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्मालाट असण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्हा प्रशासनाने उष्ण लाटेच्या काळात काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. यात तहान नसली तरी पुरेसे पाणी प्यावे, अपस्मार, हृदयरोग, मूत्रपिंड, यकृत विषयक आजारांमुळे ज्यांना शरीरात द्रवपदार्थ टिकवण्याचा प्रश्न येतो, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्‌यानंतरच द्रव पदार्थ किंवा पाणी प्राशन करावे, ओआरएस म्हणजेच तोंडान घ्यावयाचे शरीरातले पाणी वाढवणारे द्रवपदार्थ, घरगुती लस्सी, भाताची पेज, लिंबूपाणी, ताक, नारळाच पाणी घ्यावे हलक्या रंगाचे, वजनाला हलके आणि सैलसर सुती कपडे वापरा. घराबाहेर असाल तर डोके झाकावे, एखादे कापड वापरा, टोपी घाला किंवा छत्री वापरावी, डोळ्यांच्या सुरक्षेसाठी गॉगल वापरा आणि उन्हापासून कातडीचाही बचाव करायला सनस्क्रीन वापरावे, अतिउष्णतेमुळे ज्यांना सर्वाधिक हानी पोहोचेल असे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी किंवा स्थूल व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी. उष्णतेच्या काळात उन्हात जायचे टाळावे, विशेषतः दुपारी १२ ते ०३ मध्ये दुपारी बाहेर असताना श्रमाची कामे टाळावीत, अनवाणी बाहेर जाऊ नये, अतिउष्णतेच्या काळात स्वयंपाक करणे टाळावा, दार खिडक्या उघड्या ठेऊन अन्न शिजवण्याचे क्षेत्र स्वयंपाकघर हवेशीर राहील हे बघावे, दारू, चहा, कॉफी, शीतपेये टाळावे, उच्च प्रथिनयुक्त मिठाचं प्रमाण जास्त असलेले किंवा तिखट तसेच तेलकट अन्न खाऊ नये, शिळंपाकं खाऊ नये, चारचाकी वाहन लावून ठेवताना त्यात लहान मुले किंवा प्राणी ठेऊ नये, चमकणारे दिवे किंवा बल्ब्ज वापरू नका, त्यातून अनावश्यक उष्णता निर्माण होते, असे आवाहन करण्यात आले आहे.
----
पूर्ण..............कृष्णा जोमेगावकर, नांदेड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: ​सासरी होणाऱ्या मानहानीला अन् छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

SCROLL FOR NEXT