पुणे

घरगुती वादातून जावयाने केला सासूचा खून

CD

वादातून जावयाने
केला सासूचा खून
----
पत्नीवरही खंजरने हल्ला, नांदेड शहरातील घटना
----
नांदेड, ता. २२ : घरगुती वादातून जावयाने सासूवर खंजरने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात सासूचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना शहरातील शहीदपुरा भागातील अबचलनगर परिसरात शनिवारी (ता. २२) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. घटनेनंतर आरोपी जावई फरार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
बलजित कौर कुलदीपसिंग सिद्धू (वय ४९, रा. अबचलनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. गगनसिंग गणपतसिंग ऊर्फ लक्कीसिंग मिलवाले याने घरगुती वादातून सासू बलजित कौर यांच्यावर खंजरने हल्ला केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी होऊन जागीच मृत्युमुखी पडल्या. त्यानंतर आरोपीने पत्नी गुरुप्रीत कौर (वय ३०) हिच्यावरही खंजरने वार केले. यात गुरुप्रीत कौर गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. फरार गगनसिंगचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडकी बहीण योजनेच्या पैशांबाबत मोठी बातमी; फडणवीसांनी दिलं महत्त्वाचं अपडेट

Leopard Attack : सहजपूरला बिबट्याच्या हल्ल्यात १७ बोकड ठार; ईदसाठी बोकड आणले होते

Shirur Crime : जास्त व चांगल्या पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवून परप्रांतिय तरूणीवर सामुहीक अत्याचार; सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल

Balewadi Accident : चिखलामुळे बालेवाडीत दुचाकीस्वारांचे अपघात; नागरिकांचा संताप

Rahul Gandhi: महिलांची ओळख वडील, पती किंवा मुलांमुळे नाही... ‘छात्रों की गूंज’मध्ये राहुल गांधींनी मांडली महिलांच्या स्वातंत्र्याची भूमिका

SCROLL FOR NEXT