पुणे

नानगावात ट्रॅक्टरला धडकून युवकाचा मृत्यू

CD

खुटबाव, ता. ७ : नानगाव (ता. दौंड) येथे उसाच्या ट्रॅक्टरला धडकल्याने अभियंता युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. ६) सायंकाळी ७.३० वाजता घडली. यामध्ये आर्यन वासुदेव ससाणे (वय २०, रा. नानगाव, ता. दौंड) याचा मृत्यू झाला. आर्यन हा ससाणे कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. तो मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, अष्टविनायक मार्गावरील पारगाव -नानगाव रस्त्यावर गणेश रोड परिसरात उसाने भरलेला ट्रॅक्टर जागीच उभा होता. त्यावेळी नानगाव येथे रात्रीच्या सुमारास वीज नव्हती. यावेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या आर्यनला ट्रॅक्टरचा अंदाज न आल्याने तो ट्रॅक्टरला जाऊन धडकला. या अपघातात ट्रॅक्टरचे लोखंडी भाग त्याच्या हृदयाला व फुफ्फुसाला लागल्याने अंतर्गत रक्तस्राव झाला. केडगाव येथे खासगी दवाखान्यात पुढील उपचारासाठी नेले असता डॉ. भरत खळदकर यांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, बुधवारी (ता. ७) सकाळी १० वाजता शोकाकूल वातावरणात आर्यनवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई मीनाक्षी, वडील व डॉक्टर बहीण अक्षदा असा परिवार आहे. उद्योजक माऊली ससाणे हे त्याचे चुलते होत.

दोन युवक गेल्याने गावावर शोककळा
नानगाव येथील फार्मासिस्ट राहुल दिलीप खळदकर (वय २४) हा १० दिवसांपूर्वी कुरकुंभ येथील सिपला कंपनीतून सायंकाळच्या सुमारास कामावरून घरी परत येत होता. त्यावेळी कडेठाण येथे पावसामध्ये विद्युत खांबाचा अंदाज न आल्याने तो खांबाला धडकला. या धडकेमध्ये राहुलचा जागीच मृत्यू झाला. पंधरवड्यात गावातील दोन युवक गेल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

03949

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Adulteration : दुध भेसळीचे धागेदोरे मंचरपासून सोलापूर, इंदापूरपर्यंत; ‘एफडीए’ ने काढली भेसळखोरांची कुंडली, 'सोनाई डेअरी'ला भेसळयुक्त दूधाचा पुरवठा

Pune News : आम्ही अधिकारी होण्याचे स्वप्न बघायचे नाही का?; महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा सवाल, दोन केंद्रावरील परीक्षा रद्द

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Shendurwada News : रक्तरंजित वाळू, जमिनीच्या व्यवहाराची नशा, अन् विकासकामांतील भ्रष्टाचार मार्गाने पैसा कमावण्याचा नाद सुटेना

MPSC Agitation Suspended : एमपीएससी विद्यार्थ्यांचे टिळक चौकातील आंदोलन स्थगित; उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निर्णय

SCROLL FOR NEXT