पुणे

नान्नज गटात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने

CD

लोगो : नान्नज जि. प. गट
---
WDL26B02674
अनिल माळी
---
WDL26B02673
चेताली मुळे
---
भाजप-राष्ट्रवादी आमने-सामने; परिसरात रणसंग्राम
उमेदवारी कापाकापी, अंतर्गत नाराजी, शेतकरी प्रश्न, जातीय समीकरणांमुळे लढत चुरशीची
दयानंद कुंभार : सकाळ वृत्तसेवा
वडाळा, ता. २ : उत्तर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे वातावरण तापले असून, नान्नज जिल्हा परिषद गटात प्रमुख राजकीय पक्षांमध्ये थेट सामना रंगणार आहे. ओबीसी पुरुषांसाठी आरक्षित झालेल्या नान्नज गटात राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान उपसरपंच अनिल नागनाथ माळी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून माजी आमदार दिलीप माने समर्थक चेताली श्रीकांत मुळे यांना उमेदवारी मिळाली आहे. गटात भाजप अन्‌ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच निवडणुकीचा रणसंग्राम होणार आहे.
भाजपकडून चर्चेत असलेले अविनाश मार्तंडे तसेच पंचायत समिती नान्नज गणासाठी तयारी केलेले तालुकाध्यक्ष संभाजी दडे यांची नावे ऐनवेळी वगळल्याने पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली आहे. मात्र, अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केलेले व कार्यकर्त्यांवर मजबूत पकड असलेले माजी आमदार दिलीप माने हे भाजपच्या विजयासाठी सक्रिय झाले आहेत.
एका बाजूला भाजपकडे शहाजी पवार, दिलीप माने, यशवंत माने अशी दिग्गजांची फळी आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बळिराम साठे, तालुकाध्यक्ष सुवर्णा झाडे, प्रल्हाद काशीद यांची ताकद आहे. नान्नज गटात चेताली मुळे विरुद्ध अनिल माळी अशी प्रमुख लढत असली तरी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक क्षीरसागर आणि काँग्रेसचे बाळासाहेब पांढरे यांनीही प्रचारात रंगत आणली आहे.
सध्या भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसकडून कॉर्नर सभा व बैठका सुरू असून, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष वैयक्तिक संपर्कावर भर देत आहेत. कांदा, सोयाबीन, तूर, खतांच्या वाढलेल्या किमती आणि हमीभाव खरेदीतील विलंब यामुळे शेतकऱ्यांमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात नाराजी आहे. त्याचबरोबर बळिराम साठे यांचा अनुभव, दिलीप माने यांची ताकद आणि जुने भाजप कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता यामुळे नान्नज गटातील लढत अधिकच चुरशीची ठरणार आहे.
---
गणनिहाय लढती...
- वडाळा गण : अंजली सोन्याबापू माळी (शिवसेना), शिल्पा गणेश माळी (भाजप), वैशाली नरेंद्र शीलवंत (राष्ट्रवादी काँग्रेस).
तिन्ही उमेदवार कळमण गावातीलच असल्याने थेट गावांतर्गत लढत.
- नान्नज गण : सुनील भोसले (भाजप), सत्यवान गरड (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), प्रकाश चोरेकर (राष्ट्रवादी काँग्रेस), लक्ष्मण बनसोडे (काँग्रेस).
---
चौकट
जातीय समीकरणे ठरणार निर्णायक?
नान्नज गटात भाजपकडून कुणबी मराठा ओबीसी समाजातील चेताली मुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, मूळ ओबीसी समाजाला डावलल्याची भावना काही ठिकाणी व्यक्त होत आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून मूळ ओबीसी समाजातील अनिल माळी यांना उमेदवारी देण्यात आल्याने जातीय समीकरणे निकालात महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
---
जि.प. गटाचे आरक्षण
नान्नज जि.प. गट : नागरिकांचा मागास प्रवर्ग (पुरुष)
नान्नज गण : सर्वसाधारण पुरुष
वडाळा गण : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT