पुणे

चौंडेश्वरी देवीच्या पालखी मिरवणुकीने नारदीय कीर्तन महोत्सवाची सांगता

CD

KRK26B03718
करकंब (ता. पंढरपूर) : येथे नारदीय कीर्तन महोत्सवात काल्याचे कीर्तन करताना कैलासबुवा खरे.
.....
चौंडेश्वरी देवीच्या पालखी
मिरवणुकीने कीर्तनाची सांगता
.........
करकंब, ता. ४ : करकंब येथे आयोजित श्री.चौंडेश्वरी पौष पौर्णिमा नारदीय कीर्तन महोत्सवाची सांगता मुंबई येथील कैलासबुवा खरे यांच्या काल्याच्या कीर्तनाने आणि श्रींच्या पालखीच्या मिरवणुकीने भक्तिमय वातावरणात झाली.
प्रथम खरेबुवा आणि करकंब पत्रकार संघातील नूतन पदाधिकाऱ्यांच्या हस्ते चौंडेश्वरी मातेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. खरे बुवा यांनी कीर्तनाच्या पूर्वरंगामध्ये ‘असा साधूसंग घडो मजलागी’ या तारकाश्रम स्वामी महाराज यांच्या अभंगावर निरूपण करताना सांगितले की, मानव देह हा अनेक जन्माचे पुण्य पदरी असेल तरच मिळतो. अशा या मानवाच्या जन्मात भगवंताचे नाम हेच खरे अंतिम सत्य आहे. संतांच्या संगतीत दरोडेखोर सुद्धा सुधारतात. त्यामुळे संतसंग आवश्यक आहे. असा प्रसंग सांगितला. ओघवत्या भाषेतील निरूपण आणि तितक्याच सुरेल गायनाने त्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
त्यांना तितकीच सुंदर साथसंगत तबला ज्ञानेश्वर दुधाणे, हार्मोनिअम गंगाधर देव, टाळ माऊली पिसे यांनी केली. यावेळी देवीच्या नावाचा गजर करत नगर प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर आरती करून नितीन टकले यांच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला. कीर्तन महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व कोष्टी समाज बांधवांनी अधिक परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Minor Girl Acid Attack: शाळेतून घरी निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अ‍ॅसिड हल्ला; अहिल्यानगर हादरलं, नराधम फरार

Multibagger Stock: एका आठवड्यात शेअर 24% वाढला! 1 रूपयाच्या या शेअरने 5 वर्षात 1 लाखाचे 10 लाख केले

World Cup 2027 खेळण्यासाठी चुरस वाढली! १० जागांसाठी मोठमोठ्या संघांमध्येही मारामारी

Latest Marathi News Live Update : सिंहगड रस्त्यावरील तरुणाच्या खून प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात

मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा… दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’; राबवली ‘बीज गुढी’ची अनोखी संकल्पना

SCROLL FOR NEXT