नरखेड जि.प. गट
राजू खरे, उमेश पाटील व राजन पाटील यांचे फोटो वापरावेत.
नरखेडकर व अनगरकर यांची हाय व्होल्टेज लढाई
त्याच त्याच कामाची आश्वासने; घरभेटीवर सर्वांचाच भर
गो.रा. कुंभार ः सकाळ वृत्तसेवा
नरखेड, ता. ४ ः मोहोळ तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जाणारा नरखेड जिल्हा परिषद गटात निवडणुकीची लढाई नरखेडकर पाटील व अनगरकर पाटील यांच्या प्रतिष्ठेची हाय व्होल्टेज होत आहे.
४० वर्षांपासूनचे नरखेडकर व अनगरकर पारंपरिक विरोधक एकमेकांना आव्हान देत आहेत. नरखेडचे माजी जि. प. सदस्य उमेश पाटील व संतोष पाटील यांनी अनगरकरांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. तर अनगरकरांनी तेवढ्याच ताकदीने टीकेला प्रत्युत्तर देऊन तत्पर व हजर जबाबीपणा प्रचारसभांच्या माध्यमातून दाखवला आहे.
नरखेड गटात शिवसेनेच्या वतीने संतोष पाटील व भाजपकडून लखन शिंदे तर अपक्ष म्हणून शिरापूर (सो.) चे अनिल पाटील व खुनेश्वरचे लक्ष्मण मगर, आझाद पक्षाच्या वतीने देगावचे भीमरत्न सिरसट रिंगणात असून, संतोष पाटील व लखन शिंदे यांच्यातच दुरंगी सामना होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या उमेदवारांसाठी आमदार राजू खरे, उमेश पाटील, संतोष पाटील आणि भाजपकडून पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने, बाळराजे पाटील, अजिंक्यराणा पाटील, सतीश काळे, प्रचार सभा घेत आहेत.
भाजपचे उमेदवार लखन शिंदे यांनी गावागावात भेट देण्यावर भर देत आहेत. तर संतोष पाटील यांनी मतदारसंघातील प्रत्येक घरात पोचण्यावर भर दिला आहे.
सीना-भोगावती जोडकालव्याचा मुद्दा
मागील तीस वर्षांपासून विविध निवडणुकांमध्ये प्रचारात सीना-भोगावती जोड कालव्याचे काम पूर्ण करण्याचा मुद्दा गाजत आहे. याही निवडणुकीत तोच मुद्दा गाजत आहे.
पालकमंत्र्यांचा एक रुपया गाजला
प्रचारा दरम्यान देगावच्या क्रांती लॉन्समधील सभेत विरोधक रस्त्यांच्या मान्यतेची पत्र वाटत आहेत. परंतु पालकमंत्री मी असल्याने जिल्हा नियोजन समितीतून एक रुपयाही देणार नसल्याचे ठणकावून सांगितल्याने पालकमंत्र्याचा एक रुपया चांगलाच गाजला.
आमदार खरे धर्म संकटात
नरखेड गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रगती दगडे, भाजपच्या उलका पाटील, शिवसेना (उबाठा)च्या संगीता मोटे, शिवसेनेच्या ज्योत्स्ना पाटील अशी चौरंगी लढत होत आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व दोन शिवसेना एकमेकांच्या विरोधात आहेत. या निवडणुकीत आमदार राजू खरे यांच्या पक्षाचा उमेदवारही नाही. परंतु खरे यांना विधानसभेत यांनी सहकार्य केले होते. त्यामुळे आमदार खरे कोणाचा प्रचार करायचा अशा धर्म संकटात सापडले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.