पुणे

नारळी पौर्णिमा निमित्त पंढरपूरातील कोळी बांधवाची भव्य शोभा यात्रा

CD

PDR26B09951
पंढरपूर : येथे नारळी पाैर्णिमेनिमित्त महादेव कोळी समाजाच्या वतीने काढण्यात आलेली शोभायात्रा.
---
पंढरीत कोळी समाजाचा
नारळी पौर्णिमा उत्सव
होडी चालक-मालकांची भव्य शोभायात्रा
सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. २९ : नारळी पौर्णिमेनिमित्त पंढरपुरातील समस्त महादेव कोळी समाजाच्या वतीने शहरातून होडी चालक- मालक बांधवांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेची सांगता चंद्रभागा वाळवंटात करण्यात आली. यावेळी कोळी समाजाच्या वतीने चंद्रभागा नदीचे जलपूजन व जलकुंभांचे पूजन करण्यात आले.
परंपरा जपणाऱ्या या उत्सवातून कोळी समाजाच्या संस्कृतीचे दर्शन घडले. मिरवणुकीत समाजाच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध आकर्षक देखावे साकारण्यात आले होते. पारंपरिक वेशभूषा, लोककला, सांस्कृतिक सादरीकरण तसेच पूर्वजांनी जपलेल्या परंपरांचे दर्शन या मिरवणुकीतून घडले. आपल्या संस्कृतीचा वारसा आजही तितक्याच उत्साहाने पुढे नेला जात असल्याचे यावेळी दिसून आले.
शोभायात्रेत कोळी महिला व तरुणींचा मोठ्या संख्येने सहभाग होता. यावेळी माजी नगराध्यक्ष बाबा अधटराव, लक्ष्मण शिरसट, शिवसेना नेते साईनाथ अभंगराव, लक्ष्मण धनवडे, हरिभाऊ नेहतराव, पुंडलिक देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी अनिल अभंगराव, मारुती संगीतराव, हणमंत अभंगराव, मुकुंद नेहतराव आदींसह होडी चालक- मालक संघटनेचे पदाधिकारी सतीश नेहतराव, गणेश अंकुशराव, नितीन अधटराव यांच्यासह मोठ्या संख्येने कोळी महिला व तरुण सहकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MCA च्या किचनला ८७ गुण, तरी FDAची कारवाई; हायकोर्टाने घेतला आक्षेप, ५ लायसन्सवरील निलंबन हटणार

Success Story: वय 16, कंपनीत 15 कर्मचारी अन् वडिलांनाच देतो 2 लाखांचा पगार! केरळच्या या ‘AI Kid’ची भन्नाट कहाणी

Ather Konark Electric Scooter Launch : एथर एनर्जीची ‘कोनार्क’ इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च; 200 किमीपर्यंत रेंज, बॅटरीवर 10 वर्षांची वॉरंटी

MPSC Exam : कोणताही क्लास न लावता ऋषीकेश राज्यात पहीला; उद्योग निरीक्षक व दुय्यम अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्कपदी निवड

Mamata Banerjee: मोठी बातमी! ममता बॅनर्जींसह तृणमूल काँग्रेसच्या बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल; पोलिसांनी स्वतः घेतली दखल

SCROLL FOR NEXT