जेजुरी, ता. ६ ः प्रवासवर्णन केवळ स्थळदर्शनापुरते मर्यादित न राहता त्यातून इतिहास, संस्कृती, निसर्ग, कला आणि मानवी जीवनाचे व्यापक दर्शन घडले पाहिजे. डॉ. नारायण टाक यांच्या ‘प्रवासायन’ या पुस्तकातील लेखनातून अशी सर्वसमावेशक दृष्टी प्रतिबिंबित होते. हे पुस्तक मराठी प्रवासवर्णनाच्या साहित्यामध्ये मोलाची भर घालेल, असा विश्वास ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी केला.
आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, शरदचंद्रजी पवार महाविद्यालय, जेजुरी आणि जागृती प्रतिष्ठान, पुरंदर यांच्यावतीने डॉ. टाक यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी डॉ. मोरे बोलत होते. विश्वकर्मा प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
डॉ. मोरे म्हणाले, ‘‘मराठीतील सुरुवातीची प्रवासवर्णने प्रामुख्याने तीर्थयात्रांच्या वर्णनातून आली. प्रवासवर्णन हे केवळ भौगोलिक वर्णन न राहता लेखकाच्या व्यापक नजरेतून साकारले पाहिजे. त्यात उत्सुकता असावी लागते. ‘प्रवासायन’मधील लेखन वाचकाला अंतर्मुख करणारे असून लेखकाची सूक्ष्म निरीक्षणशक्ती त्यातून जाणवते.’’
विनोदी साहित्यकार व ‘सकाळ’चे मुख्य उपसंपादक सु. ल. खुटवड यांनी प्रवासासंदर्भात विविध किस्से सांगून हशा आणि टाळ्या मिळवल्या.
लेखक डॉ. नारायण टाक यांनी लेखनामागची भूमिका स्पष्ट केली. नगराध्यक्ष जयदीप बारभाई, सचिन पेशवे यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्राचार्य डॉ. धनाजी नागणे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. किशोरी ताकवले यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. चंद्रशेखर काळे यांनी आभार मानले. कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक तसेच जेजुरीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ः 04004
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.