पुणे

रोकड असलेली पिशवी नारायणगावातून पळवली

CD

नारायणगाव, ता. ८ : येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून काढलेली ८० हजार रुपयांची रोकड चोरट्याने दुचाकीच्या हँडलवरून लंपास केली. ही घटना शुक्रवारी (ता. ७) दुपारी दीडच्या सुमारास पुणे- नाशिक महामार्गावरील एका चष्म्याच्या दुकानासमोर घडली. याप्रकरणी नारायणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रगतशील शेतकरी प्रमोद नामदेव वाजगे यांच्या आईवर नारायणगाव येथील भोसले हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी वाजगे यांनी बँकेतून ८० हजार रुपये काढले होते. ही रक्कम पिशवीत ठेवून त्यांनी पिशवी दुचाकीच्या हँडलला लटकवली होती. महामार्गालगत असलेल्या एका दुकानात ते चष्मा आणण्यासाठी थांबले असता १५ ते १८ वयोगटातील एका तरुणाने संधी साधून पिशवी पळवली आणि दुचाकीवरून फरार झाला. पिशवीत रोख रकमेसह चेकबुकही होते. चोरीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीत झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: भेसळखोरांनो सावधान! दूध-पनीरनंतर आता मद्यावरही FDA वॉच ठेवणार; उत्पादन, लेबलिंगपासून भेसळीपर्यंत तपासणी होणार

Pune Dam Water : धरणे भरली, अन् चिंता मिटली; जिल्ह्यातील १३ धरणांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक साठा

Pune Metro : पुणे मेट्रो ३ साठी मुहूर्तच मिळेना; सर्व स्थानके कार्यान्वित होऊन मेट्रो धावेपर्यंत मार्च २०२७ उजाडणार

Sadanand Date : पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञान वापर करून गुन्ह्यांचा तपास करावा

Nashik earthquake: नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के; 3.8 रिश्टर स्केलची तीव्रता

SCROLL FOR NEXT