पुणे

बाजारभावाअभावी उत्पादकांचे चेहरे कोमजले

CD

नारायणगाव, ता. १८ : जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाणीटंचाईच्या परिस्थितीत मल्चिंग, ठिबक सिंचनाचा वापर करून शेवंती, झेंडूचे मळे फुलवले आहेत. मात्र, सध्या घसरलेल्या बाजारभावात तोडणी, मजुरी, वाहतूक खर्च वसूल होत नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी फुलांची तोडणी थांबवली आहे. यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे.

तालुक्यात रंगीबेरंगी शेवंती, झेंडूच्या फुलांचे बहरलेले मळे लक्ष वेधून घेत असताना बाजारभाव नसल्याने उत्पादकांचे चेहरे कोमजले आहेत. सध्या झेंडूच्या फुलांना प्रतिकिलोग्रॅम २० ते ३० रुपये तर शेवंतीच्या फुलांना रंगानुसार २५ ते ६० रुपयांच्या दरम्यान बाजारभाव मिळत आहे. तोडणी मजुरी, आडत, वाहतूक आदींसाठी प्रतिकिलोग्रॅम ३० ते ४० रुपये खर्च होत आहे.
नारायणगाव, आर्वी, गोळेगाव, कुसुर, निमदरी, पिंपळवंडी, उंब्रज, गुंजाळवाडी, वडज भागातील प्रामुख्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांनी मल्चिंग, ठिबक सिंचनाचा वापर करून झेंडू, शेवंतीच्या जांभळ्या, पांढऱ्या, पिवळ्या, लाल, गुलाबी, दुहेरी रंग आदी विविध रंगांच्या फुलांची लागवड केली आहे. दसरा व दिवाळी कालावधीतील काही दिवसांचा अपवाद वगळता यावर्षी शेवंती, झेंडूच्या फुलांना समाधानकारक भाव मिळाला नाही. लक्ष्मीपूजन या दिवशी मुंबई व पुणे बाजारपेठेत झेंडूच्या फुलांना प्रतवारीनुसार प्रतिकिलोग्रॅम ५० ते ६० रुपये तर शेवंतीच्या फुलांना रंगानुसार प्रतिकिलोग्रॅम ८० रुपये ते दोनशे रुपये असा बाजारभाव मिळाला होता. त्यानंतर बाजारभावात घसरण झाली. झेंडूच्या फुलांचा तोडणी हंगाम एक ते दीड महिना सुरू राहतो.

शेवंतीसाठी एकरी दीड लाखांचा खर्च
फुलांच्या लागवडीसाठी ठिबक, मल्चिंग पेपरचा वापर केला आहे. रोपाची वाढ होण्यासाठी शेवंतीला सुरुवातीच्या काळात रात्री विद्युत प्रकाशाची सोय करावी लागते. यामुळे शेवंतीचा मळा फुलवण्यासाठी एकरी सुमारे दीड लाख रुपये भांडवली खर्च येतो.

फुलांवर रोगांचा प्रादुर्भाव
वाढलेल्या थंडीमुळे शेवंतीच्या फुलांवर करपा, तुडतुडे, मवा, फुलकिडे या कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. मात्र भाव नसल्याने फवारणीचा खर्च करणे परवडत नाही.

मजूरटंचाई
सध्या कांदा लागवड सुरू असल्याने ८०० ते १००० रुपये मजुरी झाली आहे. मोठ्या प्रमाणात मजूरटंचाई निर्माण झाली आहे. एक वेळ कंपनीला इंजिनिअर सहज उपलब्ध होतील. मात्र, शेतीच्या कामासाठी कुशल मजूर वेळेला उपलब्ध होत नाहीत, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे.

दिवाळीनंतर हारासाठी वापरत असलेल्या सुट्ट्या फुलांना मागणी घटली आहे. सुट्ट्या फुलांच्या भावात घट झाली आहे. मात्र पुष्पगुच्छांसाठीच्या शोभिवंत फुलांचे भाव स्थिर आहेत. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे.
- जगदीश दुराफे, फूल व्यापारी, भुलेश्वर, मुंबई

08905

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SMAT 2026: सूर्यकुमार यादव यावेळी मात्र फसला; ललित यादवच्या वादळी खेळीने मुंबईला रडवले, पण तरी हरला गोवा संघ!

Sona Mohapatra On Salman Khan : सैनिकांच्या बलिदानावरचा सिनेमा आणि 'दोन पेग'चं गाणं? सलमान खानवर सोना मोहापात्राचा संताप; म्हणाली, "कोणाच्या करिअरला..."

Latest Marathi News Live Update : मोर्शी नगरपरिषदेतील 'ओल्या पार्टी' प्रकरणी मोठी कारवाई

Success Story: आईने दागिने विकले, बापाने कर्ज काढलं; भावासाठी बहिणींनी शेतात केली मजुरी; लेकाने UPSC मध्ये मिळवली 239 वी रँक!

काँग्रेसचा अध्यक्ष, शिंदे सेनेचा उपाध्यक्ष; सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सर्वपक्षीय सत्ता

SCROLL FOR NEXT