पुणे

नारायणगाव ग्रामपंचायतीला ग्राम समृद्धीचा ध्यास

CD

भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशाची खरी ओळख  खेड्यांमध्ये दडलेली आहे. गावांचा विकास म्हणजेच देशाचा विकास असे म्हटले जाते. ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यासाठी ‘ग्राम समृद्धी’ ही संकल्पना नारायणगाव ग्रामपंचायतीने प्रत्यक्ष कृतीत आणली आहे.
-डॉ. शुभदा वाव्हळ( प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच)


ग्राम समृद्धी म्हणजे केवळ आर्थिक विकास नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि पर्यावरणीय विकासाचा समतोल साधणे होय. त्या दृष्टीने उपसरपंच योगेश पाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्य, राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून काम सुरू आहे. ग्राम समृद्धी साध्य करण्यासाठी विकास कामाबरोबरच तरुणांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, वृक्षारोपण, महिलांना व्यवसाय मार्गदर्शन, आरोग्य तपासणी शिबिर याकडे लक्ष दिले जात आहे. त्याचे दृश्य स्वरूपातील परिणाम दिसू लागले आहे. यामुळे नारायणगाव ग्रामपंचायतीची ओळख खऱ्या अर्थाने समृद्धग्राम होत आहे.


पर्यावरण संरक्षण
ग्लोबल वॉर्मिंगचा विचार करून नारायणगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गणपीर बाबा डोंगर परिसरात वनविभागाच्या जागेत सुमारे ५ हजार देशी झाडांचे वृक्षारोपण करून संवर्धन केले आहे. या झाडांना नियमित पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे वनराई फुलली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना फळरोपांचे वाटप केले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडून निसर्ग संवर्धन झाले आहे. विषमुक्त भाजीपाला उत्पादनासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने परसबाग भाजीपाला लागवड हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान, रॉयल ॲकॅडमीच्या माध्यमातून तरुणांना एमपीएससी, सरळ सेवा भरतीसाठी वर्ष २०१९पासून मार्गदर्शन केले जात आहे. प्रा. धनेश वारुळे, प्रा. प्रथमेश वाणी हे स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेत आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आवश्यक ती पुस्तके उपलब्ध करून दिली जात आहेत. योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे मागील सहा वर्षात सुमारे शंभर विद्यार्थी प्रशासकीय सेवेत दाखल झाले आहेत.

महिलांना प्रशिक्षण
मुख्यमंत्री व प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जात आहे. मार्केटिंग, सरकारच्या विविध योजना, व्यवसायासाठी कर्ज पुरवठा व अनुदान याबाबतची माहिती देऊन स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. याचा लाभ घेऊन महिलांनी व्यवसाय सुरू केले आहेत. यासाठी ग्रामपंचायत सदस्य भावना बेल्हेकर, धनेश वारुळे हे मार्गदर्शन करत आहेत.

आरोग्य तपासणी शिबिर
ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, पुण्यातील डी. वाय. पाटील आरोग्य महाविद्यालय व इतर सामाजिक संस्थांच्या वतीने नारायणगाव ग्रामपंचायतीकडून आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन केले जाते. या माध्यमातून गरजू रुग्णांवर उपचार केले जातात. शिबिराच्या माध्यमातून  मोतीबिंदू व इतर अशा सुमारे एक शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आहेत. या शिबिराचा लाभ गरजू रुग्णांना झाला आहे.

सुसज्ज ग्रंथालय
वाचन संस्कृती जोपासण्यासाठी नारायणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी सार्वजनिक वाचनालय सुरू करण्यात आले आहे. या वाचनालयाची स्थापना १९५९मध्ये करण्यात आली आहे. सरकारचा ब वर्ग दर्जा असलेल्या या वाचनालयात
स्पर्धा परीक्षा, कथा, कादंबऱ्या, कविता, ग्रंथ आदींची १२ हजार १३२ पुस्तके आहेत. वाचनालयाचे नियमित वाचक असलेले ३०९ सभासद आहेत. ग्रंथालयात विविध प्रकाशनाची मासिके व वृत्तपत्र उपलब्ध करून दिली जातात. वाचनालयासाठी स्वतंत्र इमारत आहे. ग्रंथालयाला शासनाचे आदर्श ग्रंथालय व ग्रंथपाल पुरस्कार मिळाले आहेत. दीपक जोशी, संतोष कोल्हे हे ग्रंथपाल म्हणून उत्कृष्ट पद्धतीने काम पाहत आहेत. ग्रंथालयाला लेखक वि. वा. शिरवाडकर, प्रा. शिवाजीराव भोसले, शिवाजी सावंत, अनंतराव कुलकर्णी, संदेश भंडारे आदींनी यापूर्वी भेटी दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET SCAM : नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट ! सीबीआयच्या अटकेत असलेल्या मनीषा मांढरे यांचे कॉलेजकडून निलंबन

ITR Update: आयकर विभागाने जारी केले सर्व ITR फॉर्म! तुमच्यासाठी कोणता योग्य? ऑनलाइन रिटर्न कसा भराल? जाणून घ्या

Kerala CM VD Satheesan : कोण आहेत केरळचे नवे मुख्यमंत्री व्ही.डी. सतीशन? 'इतक्या' संपत्तीचे आहेत मालक...

Latest Marathi News Live Update : NEET पेपरफुटीचं प्रकरण तापलं, पुण्यात NSUI कडून आंदोलन, पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

Pune Hospital: माणुसकीला काळिमा! पुण्यातील हॉस्पिटल वाद चिघळला, १३ तासांचे बिल ३.२५ लाख, मृतदेह रोखून धरल्याचा आरोप, राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक..

SCROLL FOR NEXT