नारायणगाव, ता. २७ : प्रवासी ज्येष्ठ महिलेचे एक लाख वीस हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरून पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या जयनगर (जि. लातूर) येथील महिलेला नारायणगाव पोलिसांना मुद्देमालासह अटक करण्यात यश आले आहे.
इंगळून (ता. जुन्नर) येथील रखमाबाई अनंता दिवटे (वय ८०) या आदिवासी महिलेचे मंगळसूत्र चोरीप्रकरणी महादेवी सर्जेराव देडे (वय ३४, रा. जयनगर, जि. लातूर) या महिलेला चोरी झाल्यानंतर काही वेळातच नारायणगाव पोलिसांनी नारायणगाव बसस्थानकात अटक केली आहे. दरम्यान, सोमवारी (ता. २६) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास रखमाबाई जुन्नर येथे जाण्यासाठी नारायणगाव-जुन्नर बसमध्ये प्रवेश करत होत्या. त्यावेळी महादेवी देडे यांनी गर्दीचा फायदा घेऊन रखमाबाई यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हातचलाखीने काढून घेतले. संशय आल्याने याबाबतची माहिती दिवटे यांनी बस स्थानक चौकीत असलेल्या पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करून महादेवी देडे यांना ताब्यात घेतले. चौकशीत महादेवी यांनी मंगळसूत्र चोरीची कबुली दिली.
याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण संपांगे म्हणाले, की दिवाळी सण जवळ आला आहे. या कालावधीत बसमध्ये गर्दी असते. या संधीचा फायदा घेऊन दागिने चोरीच्या घटना होतात. त्यामुळे महिलांनी सतर्क राहावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.