Narayangaon Peoples Sakal
पुणे

Narayangaon News : मुस्लिम बांधव आपले गाव, आपली अयोध्या उत्सवात होणार सहभागी

नारायणगाव, वारूळवाडी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या आपले गाव, आपली अयोध्या या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याचा निर्णय नारायणगाव येथील मुस्लिम बांधवांनी घेतला आहे.

रवींद्र पाटे

नारायणगाव - राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त २२ जानेवारी २०२४ रोजी नारायणगाव, वारूळवाडी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या आपले गाव, आपली अयोध्या या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याचा निर्णय नारायणगाव येथील मुस्लिम बांधवांनी घेतला आहे.

यानिमित्त नारायणगाव, वारूळवाडी परिसरातील सर्व चिकन, मटन विक्रीची दुकाने २२ जानेवारी रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नारायणगावचे उपसरपंच योगेश पाटे, वारुळवाडी चे सरपंच राजेंद्र मेहेर यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

या संदर्भात आज नारायणगाव पोलीस ठाण्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी सहीफ शेख, सलीम इनामदार, उपसरपंच योगेश पाटे, सरपंच राजेंद्र मेहेर, माजी उपसरपंच संतोष वाजगे, संतोष दांगट, अक्षय खैरे, हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

सहीफ शेख, सलीम इनामदार म्हणाले, हिंदू-मुस्लिम समाजामध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे. या उद्देशाने आपले गाव, आपली अयोध्या या हिंदू धर्मीयांच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

उपसरपंच पाटे म्हणाले, नारायणगाव परिसरातील मुस्लिम व हिंदू बांधव यांच्यामध्ये एकोप्याचे वातावरण आहे. येथील ग्रामदैवत मुक्ताबाई देवीच्या यात्रेत मुस्लिम समाजाचा सहभाग असतो. या माध्यमातून ऐक्याचे दर्शन घडते. यावेळी 22 जानेवारी रोजी नारायणगाव वारूळवाडी परिसरातील मद्याची दुकाने बंद ठेवण्यात यावीत. या मागणीचे निवेदन हिंदू संघटनेच्या वतीने उपसरपंच योगेश पाटे यांना देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas Kadam : 'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीवर ठेवला' ही माहिती रामदास कदमांना कुणी दिली? स्वत: सांगितलं नाव...

Maharashtra tourism : महाराष्ट्राचे दार्जिलिंग! फोफसंडी गावाची या खासियत तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

Pune Crime: पुण्यातील दौंडमध्ये थरारक घटना! पत्नीचा गळा दाबून खून, नंतर उचललं टोकाचं पाऊल

Latest Marathi News Live Update : फर्ग्युसन रस्त्यावरील वाहतूक आज काही वेळासाठी बंद करण्यात येणार

Panchang 3 October 2025: आजच्या दिवशी अर्गला स्तोत्र पठण व ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT