पुणे

चाळीत युरिया टाकून २५ टन कांद्याचे नुकसान

CD

नारायणगाव, ता. १५ : कांद्याची काढणी केल्यानंतर चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्यावर अज्ञाताने युरिया टाकल्याने अल्पभूधारक शेतकऱ्याच्या सुमारे २५ टन कांद्याचे नुकसान झाले आहे. ही घटना नारायणगाव ग्रामपंचायत हद्दीतील कोल्हेमळा येथे घडली.
याप्रकरणी नारायणगाव पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून कांदा चाळीत युरिया टाकणाऱ्या विकृत व्यक्तीचा शोध लावावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य हेमंत कोल्हे यांनी केली आहे.
साकोरी (ता. जुन्नर) येथील श्रीहरी बनकर यांनी नारायणगाव (कोल्हेमळा) येथील सावता चिमाजी कोल्हे यांच्या अडीच एकर क्षेत्रात अर्धलीन या तत्त्वावर कांदा लागवड केली होती. कांदा लागवड ते काढणी दरम्यान सुमारे अडीच लाख रुपयांचा भांडवली खर्च झाला होता. दरम्यान, मुलीचा विवाह असल्याने मागील दोन दिवस बनकर साकोरी येथे गावी गेले होते. आज सकाळी ते नारायणगाव येथे आले असता कांदा चाळीची पाहणी करत असताना चाळीतील कांद्यावर मोठ्या प्रमाणात युरिया टाकल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीदरम्यान निवडणूक आयोगात मोठे फेरबदल; मतदारयादी विभागातील अधिकाऱ्यांची बदली

वयाच्या २६ व्या वर्षी ७५ लाखांची संपत्ती! १८ हजारांच्या पगारापासून सुरू झाला प्रवास

वयाच्या ६० व्या वर्षीही मिलिंद सोमण अनवाणी धावतात! पायांच्या स्नायूंना होतात 'हे' फायदे; पण ही काळजी घ्या

सायन रुग्णालयात डॉक्टरने जीवन संपवलं; स्वत:लाच सलाईन लावत ॲनस्थेशियाचा ओव्हरडोस घेतला, बाथरूममध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

Maharashtra Live News : सीजेपी आंदोलकांची पुण्यात धरपकड

SCROLL FOR NEXT