पुणे

कांदळी गोळीबारातील मुख्य आरोपी अटकेत

CD

नारायणगाव, ता. १३ : कांदळी (ता. जुन्नर) येथील श्री तुळजाभवानी सांस्कृतिक कला केंद्रात कार्यक्रमाच्या बारीवरून गोळीबार करून फरार झालेल्या मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अविनाश लक्ष्मण कोळेकर (वय ३०, रा. हनुमान वाडी, आळंदी देवाची, ता. खेड) असे त्याचे नाव असून, त्याच्याकडून ५० हजार रुपयांचे देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने मंगळवारी (ता. ११) रोहकल फाटा येथून कोळेकरला ताब्यात घेतले. यापूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने शिवशंकर मारुती हळदेकर (वय २८, रा. मेदनकरवाडी) याला अटक केली होती. या गुन्ह्यातील चारपैकी दोन आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात असून, अन्य दोन जण अद्याप फरार आहेत. अविनाश कोळेकर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर सासवड, सुपे आणि जुन्नर पोलिस ठाण्यांत केबल चोरीचे चार गुन्हे दाखल आहेत. आरोपीला पुढील तपासासाठी उत्तर चाकण पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NHAI New Rules: रुग्णवाहिका उशिरा आली तर दंड होणार! NHAI चा मोठा निर्णय; सर्व प्रकल्पांत ‘केअर सिस्टम’ बंधनकारक, नवे नियम काय?

आठवडाभरापूर्वी मातृशोक, नितीश राणाने मैदानात उतरत आईला वाहिली अनोखी श्रद्धांजली

BMC Recruitment: मुंबई महापालिकेत ६१२ जागांवर भरती; ITI पास तरुणांना मोठी संधी! पाहा कोणती पदे आणि अर्ज प्रक्रिया काय?

Shivsena Hearing: शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीदरम्यान कोर्टात काय घडलं? संजय राऊतांना जिंकण्याचा विश्वास, म्हणाले...

Manvat Crime : 50 वर्षीय व्यक्तीचे अपहरण करून बेदम मारहाण; पोलिसांनी नाकाबंदीत पाच जणांना घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT