Marriage fraud esakal
पुणे

Pune Crime : पुण्यात डॉली की डोली टोळी, एका पोरीने वीसजणांशी लग्न करून फसवलं

दोन तरुण मुलांशी विवाह करून रोख रक्कम व दागिने घेऊन पसार होणाऱ्या बनावट नवरी मुलीसह सहा जणांच्या टोळीला जुन्नर न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी दिली.

सकाळ वृत्तसेवा

नारायणगाव - जुन्नर तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील दोन तरुण मुलांशी विवाह करून रोख रक्कम व दागिने घेऊन पसार होणाऱ्या बनावट नवरी मुलीसह सहा जणांच्या टोळीला जुन्नर न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी दिली. या बनावट नवरीने मागील दीड वर्षात पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातील सुमारे वीस मुलांशी विवाह करून आर्थिक फसवणूक केल्याची कबुली प्राथमिक तपासात दिली आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे व तपासी अधिकारी व्ही. व्ही. ध्रुवे यांनी दिली.

या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी अटक केलेली बनावट नवरी जयश्री काळू घोटाळे (वय ३५, रा. मुरंबी शिरजगाव, ता. त्रंबकेश्वर, जि. नाशिक), बनावट मावशी मीरा बंसी विसलकर (वय ३९), तुकाराम भाऊराव मांगते (वय २३, दोघेही रा. अंबुजा वाडी, इगतपुरी घोटी, जि. नाशिक), बाळू भिकाजी काळे (वय ४६, रा. बोटा, ता. संगमनेर, जि. नगर), एजंट शिवाजी शंकर कुरकुटे (वय ६४  रा. कुरकुटेवाडी, बोटा), बाळू गुलाब सरवदे (वय ४१, रा. गुंजाळवाडी, ता. जुन्नर) या आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर, सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक व्ही. व्ही. ध्रुवे हे करत आहेत.प्राथमिक पोलिस तपासात या टोळीने मागील दोन महिन्यात जुन्नर तालुक्यातील चार, संगमनेर तालुक्यातील दोन, अशा सहा जणांची; तर मागील दीड वर्षात पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातील एकूण वीस मुलांशी विवाह करून लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची कबुली दिली.

नोकरी नसलेल्या शेतकरी कुटुंबातील मुलांची वेळेत लग्न होत नाहीत. या समस्येचा फायदा घेऊन या टोळीने बनावट नवरी मुलगी, मावशी, नातेवाईक तयार करून मध्यस्थीमार्फत कमिशन घेऊन विवाह जमवून एकाच मुलीचे वीस तरुणांसोबत विवाह करून फसवणूक केली. समाजात प्रतिष्ठा जाऊ नये म्हणून तक्रार देण्यास मुले तयार होत नसल्याने या टोळीचा हा धंदा सुरू होता. मात्र, नारायणगाव पोलिस ठाण्यात तक्रार येताच पोलिसांनी तपास करून या टोळीला प्रथमच जेरबंद केले.

- पृथ्वीराज ताटे, सहायक पोलिस निरीक्षक, नारायणगाव (ता. जुन्नर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT