पुणे

जुन्नर तालुक्यात खरीप पिके धोक्यात

CD

नारायणगाव, ता. ५ : जुन्नर तालुक्यात मागील एक महिन्यापासून पाऊस सुरू आहे. यामुळे शेत जमिनीत पाझर फुटले आहेत. सूर्यप्रकाशाचा अभाव, ढगाळ वातावरण व जमीन पाणथळ झाल्याने वापसा नसल्यामुळे खरीप पिके धोक्यात आली आहेत. पिकांवर करपा व मर रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी पावसाच्या उघडिपीची प्रतीक्षा करत आहेत.
याबाबत कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ राहुल घाडगे म्हणाले की, यंदा तालुक्यात बुधवारअखेर (ता. ५) ५९२.९ मिलिमीटर (१६५.६ टक्के) पाऊस झाला आहे. सरासरीपेक्षा ६५ टक्के जास्त पाऊस झाल्याने शेत जमिनीला अक्षरशः पाझर फुटले आहेत. शेती पाणथळ झाल्यामुळे खरीप हंगामात पेरणी केलेली पिके धोक्यात आली आहेत. तालुक्यात खरीप पिकाखाली ५८ हजार हेक्टर क्षेत्र आहे. या पैकी भात (१० हजार हेक्टर), सोयाबीन (९ हजार हेक्टर), मका (२ हजार हेक्टर), कडधान्य (११ हजार हेक्टर), भुईमूग (३ हजार ५०० हेक्टर), बाजरी (३ हजार हेक्टर) ही प्रमुख पिके घेतली जातात. सद्यस्थितीत ही पिके जवळपास एक महिन्याची झाली आहेत. सततच्या पावसामुळे पिकात तण वाढले आहे. वापसा नसल्यामुळे रासायनिक खतांचा डोस देणे, खुरपणी, कीड रोग नियंत्रणासाठी फवारणी करणे आदी पिकांच्या आंतरमशागतीची कामे करता आली नाहीत. शेतात पाणी साठल्यामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणात करपा, मूळकुज व मर रोग या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. याशिवाय तालुक्याच्या मध्य भागात लाखो रुपयांची भांडवली गुंतवणूक करून शेतकऱ्यांनी टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, मिरची, वालवड आदी भाजीपाला पिकांची लागवड केली आहे. भाजीपाला पिके सुद्धा धोक्यात आली आहेत. सततच्या पावसाचा फटका खरीप पिकांना बसल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे.

जून व जुलै महिन्यातील स्थिती
सरासरी पाऊस..........३३४.४ मिलिमीटर
प्रत्यक्ष झालेला पाऊस..........५२४.६ मिलिमीटर


एक ते पाच ऑगस्ट दरम्यानचा सरासरी पाऊस..........२३.६ मिलिमीटर
प्रत्यक्ष झालेला पाऊस..........६८.६ मिलिमीटर


मागील दोन महिन्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. जमिनीची भूजल पातळी वाढली आहे. पिके वाचवण्यासाठी साठलेले पाणी चराद्वारे पिकातून काढून द्यावे. मर व करपा रोगापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईडची फवारणी करावी.
- राहुल घाडगे, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव

08447

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MCOCA: पुण्यात विषारी दारूमुळे २१ जणांचा बळी घेणाऱ्या टोळीवर ‘मकोका’; राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

Daund News : बनावट कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणात दौंडचे नगरसेवक रोहित पाटील यांचे सदस्यत्व रद्द

Food Safety Crackdown: कऱ्हाडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; दोन हॉटेल सील, तीन हॉटेलांवर दंडात्मक हालचाली

Latest Marathi News Live Update : श्रेया कालरा हिने नेटफ्लिक्सचा 'कॅप्टिव्ह' रिअ‍ॅलिटी शो जिंकला

ती सगळ्यांसमोर पाणउतारा करायची... अशोक शिंदेनी सांगितलं सेटवर कशा वागायच्या अलका कुबल; पहाटे साडे पाचला...

SCROLL FOR NEXT