पुणे

विद्यार्थ्यांची भर उन्हात पायपीट

CD

नारायणगाव, ता. २० : नारायणगाव-मंचर मार्गावरील कृषी विज्ञान केंद्र (शेळी फार्म) थांब्यावर एसटी बस थांबत नसल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. ऐन परीक्षेच्या काळात बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना उन्हात पायपीट करावी लागत असून, खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.
नारायणगाव (ता. जुन्नर) येथील ग्रामोन्नती मंडळाच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या समस्येचा मोठा फटका बसत आहे. शासनाने विद्यार्थिनींना मोफत प्रवास सवलत दिली असली, तरी बस थांबत नसल्याने त्यांना खासगी वाहनांसाठी पैसे मोजावे लागत आहेत. सध्या परीक्षा सुरू असून, दुपारी दोन ते चार या वेळेत पेपर असतो. मात्र, बस थांबत नसल्याने वीस मिनिटांच्या प्रवासासाठी दोन ते तीन तास आधी घरून निघावे लागते, असे श्रावणी तांबडे या विद्यार्थिनीने सांगितले.
मंचर परिसरातील सृष्टी थोरात, साक्षी चिखले, वैष्णवी लोंढे यांनीही या त्रासाबाबत संताप व्यक्त केला आहे. खासगी वाहने वेळेत मिळत नाहीत आणि त्यात प्रवास करणे असुरक्षित आहे. एसटी प्रशासनाने या थांब्यावर बस थांबवून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत.

नारायणगाव व मंचर आगाराशी याबाबत यापूर्वी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, कार्यवाही झाली नाही. त्यामुळे वर्षभरापासून विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
- डॉ. आनंद कुलकर्णी, प्राचार्य, कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव

याबाबत नारायणगाव व मंचर येथील वाहतूक नियंत्रक यांच्याशी चर्चा करून विद्यार्थ्यांची समस्या सोडवली जाईल. तसेच, कृषी विज्ञान केंद्र येथील थांब्यावर बस थांबवण्यासाठी सूचना केल्या जातील.
- वसंत आरगडे, आगारप्रमुख, नारायणगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway Controversy : शक्तिपीठ महामार्ग झाल्यास पश्‍चिम महाराष्ट्राला महापुराचा धोका, राजू शेट्टींनी मांडल गणित; '१७ किमीचा डोंगराएवढा भराव'

IPL 2026 : विराट कोहलीचा 'पार्टनर' परतणार, RCB प्ले ऑफमध्ये राडा घालणार… गतविजेत्यांना मिळालं बळ

Latest Marathi News Live Update : ठाण्यात सर्व औषध दुकान दारांचा बंदला पाठिंबा

आता फक्त गरजेचाच माल आयात होणार! अनावश्यक विदेशी वस्तूंवर सरकार बंदी घालणार; व्यापार तूट कमी करण्यासाठी मास्टरप्लॅन

Mumbai Bogus Birth Certificates : मुंबई महापालिकेत ८७ हजारांहून अधिक बोगस जन्म प्रमाणपत्रांचा आरोप

SCROLL FOR NEXT