Bullock Cart race sakal
पुणे

MP Dr. Amol Kolhe : बैलगाडा शर्यतीच्या लढ्यावर चित्रपट बनवणार

सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने आज बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली हा आनंदाचा, समाधानाचा, अगदी दसरा - दिवाळीच्या सणासारखा दिवस आहे.

रवींद्र पाटे

नारायणगाव - सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने आज बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली हा आनंदाचा, समाधानाचा, अगदी दसरा - दिवाळीच्या सणासारखा दिवस आहे. त्यामुळे याचसाठी केला होता अट्टाहास आशी भावना व्यक्त करून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. हे संपूर्ण यश सर्व बैलगाडा मालक, शौकिनांचे असल्याचे त्यांनी नम्रपणे सांगितले.

बैलगाडा शर्यती बाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जाहीर होताच आज बैलगाडा मालक शेतकऱ्यांनी नारायणगाव येथील जनसंपर्क कार्यालयात खासदार डॉ. कोल्हे यांना पेढा भरवून जल्लोषात आनंद साजरा केला. या वेळी खासदार डॉ. कोल्हे यांनी पत्रकार व कार्यकर्ते यांच्याशी सवांद साधला.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना खासदार डॉ. कोल्हे म्हणाले सर्वोच्च न्यायालयाने काही अटी, शर्ती घालून बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली आहे. त्यामुळे बंदी उठल्याचा जेवढा आनंद आहे, तेवढीच जबाबदारीची जाणीव आहे. त्यामुळे पुढील काळात सर्व नियम, अटी-शर्ती पाळून दिमाखाने बैलगाडा शर्यतींचे आयोजन होईल.

खासदार डॉ. कोल्हे म्हणाले, भल्याभल्यांना वाटत होतं की, बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळणार नाही. परंतु मी पहिल्यापासून ठामपणे व आत्मविश्वासाने सांगत होतो की बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू होणार. माझ्या प्रयत्नांना महाविकास आघाडी सरकार, सध्याच्या सरकार व यंत्रणांनी साथ दिली त्यांचा मी ऋणी आहे. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी खूपच सहकार्य केले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांचेही मार्गदर्शन लाभले. अनेक वर्षे सातत्यपूर्ण लढा देणाऱ्या बैलगाडा मालकांचे व सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे खासदार डॉ. कोल्हे यांनी या वेळी आभार मानले.

डॉ. अमोल कोल्हे (खासदार) -

बैलगाडा शर्यतींवर लवकरच आपण चित्रपट बनवणार असून त्याची तयारी आधी पासूनच सुरू आहे. बैलगाडा मालकांचे कष्ट, त्यांचं बैलांशी असलेलं नातं या सगळ्याचा उहापोह चित्रपटात असेल. त्याचबरोबर एक आंतरराष्ट्रीय दबावतंत्र या बैलगाडा शर्यतीं संदर्भात वापरलं जातं ही बाब गेली चार वर्ष संसदेत हा विषय मांडताना फार जवळून बघतोय. या आंतरराष्ट्रीय दबावाचा बुरखा फाडणारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT