पुणे

डॉ. दाभोलकर हत्याप्रकरण : आरोपी भावेच्या जामिनावर 16 जानेवारीला निकाल

सकाळ वृत्तसेवा

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी विक्रम भावे याने केलेल्या जामीन अर्जावर 16 जानेवारी रोजी निकाल दिला जाणार आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू असून, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाला आहे.

भावे यास बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्यात 10 वर्ष शिक्षा झाली असून, त्यातील पाच वर्षे तो तुरुंगात होता. अपील लवकर चालणार नाही, म्हणून उच्च न्यायालयाने त्याला जामीन दिला आहे. आता त्याला जामिनावर सोडल्यास तो फरार होऊ शकतो. तसेच पुराव्यांमध्ये देखील छेडछाड करू शकतो. कर्नाटक पोलिसांनी कर्नाटक संघटनात्मक गुन्हेगारी कायद्यानुसार या प्रकरणातील आरोपी शरद कळसकर याचा जबाब घेतला आहे. त्यात त्याने या गुन्ह्यात भावेची काय भूमिका आहे, हे पोलिसांना सांगितले होते.

तसेच कळसकरने कधीही न्यायालयात सांगितले नाही की, माझा जबाब जबरदस्तीने घेतला आहे. त्यामुळे यातून भावेचा प्रथमदर्शनी सहभाग दिसून येतो. सीबीआयने गुन्ह्याचे ठिकाण आणि हल्लेखोरांनी पुढे काय केले याचा पंचनामा केला आहे. त्यात देखील भावेची भूमिका पुढे आली आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी सहभाग आणि त्याबाबतचे पुरावे यांचा विचार करून न्यायालयाने भावेचा जामीन फेटाळावा, असा युक्तिवाद सीबीआयचे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी गुरुवारी यांनी केला.

दरम्यान, आरोपी ऍड. संजीव पुनाळेकर यांनी या गुन्ह्यातून वगळण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. ऍड. पुनाळेकर यांना काही दिवसांपूर्वी अटी शर्तींवर जामीन मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT