modi vs supriya sule  sakal
पुणे

PM मोदी 3.0 सरकारच्या पहिल्या अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी काय असणार इंडिया आघाडीचा प्लॅन, सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं

Supriya Sule: महाविकास आघाडीचे ३० खासदार आणि देशातील इंडिया आघाडीच्या वतीने सविस्तर चर्चा आम्हाला हवी आहे

सकाळ वृत्तसेवा

Narendra Modi: अठराव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात शेतकरी प्रश्न आणि नीटची परीक्षा आणि आरक्षणाचा विषय या विषयावर आम्ही इंडिया आघाडीच्या वतीने सविस्तर चर्चा करण्याची मागणी आम्ही करणार आहोत. अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

कोंढवे- धावडे येथे कार्यक्रमाच्या निमित्ताने खासदार सुळे आल्या होत्या. त्यावेळी पत्रकारांशी बोलत होत्या. नीटच्या परीक्षेत सातत्याने घोळ होत आहेत. याबाबत मी एसआयटी’ची मागणी केली आहे. तर नवीन लोकसभेत शेतकरी प्रश्न आणि नीटची परीक्षा आणि आरक्षणाच्या याविषयवरच आम्ही महाविकास आघाडीचे ३० खासदार आणि देशातील इंडिया आघाडीच्या वतीने सविस्तर चर्चा आम्हाला हवी आहे.

जीएसटी कौन्सिलमध्ये दुधावरील वाढीचा प्रस्ताव दिला आहे. याप्रश्नावर बोलताना त्या म्हणाल्या, जीएसटी कौन्सिलमध्ये महाराष्ट्राच्या वतीने कोण गेले होते. महाराष्ट्रातल्या प्रतिनिधींनी याचा विरोध का नाही केला, कारण आम्ही याबाबत केंद्रात प्रश्न विचारतो. त्यावेळी आम्हाला राज्यातील लोक येथे येतात. असं उत्तर दिले जाते.

महाराष्ट्र राज्याने काय भूमिका घेतली आहे. याचे उत्तर मला अपेक्षित आहे. हा निर्णय होत होता. तेव्हा महाराष्ट्र सरकार जीएसटी कौन्सिलमध्ये काय करत होतं, हे होऊच कसं दिलं, लहान मुलांनी आता दूध प्यायचं नाही का, असा प्रश्न खासदार सुळे यांनी केला.

मंचर मध्ये एका राजकीय व्यक्तीच्या पुतण्याच्या गाडीने दोन जणांना धडक दिली आहे. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, राज्यात ‘हिट अँड रण’च्या केसेस वाढत चाललेले आहेत. मी राज्यातील गृहमंत्र्यांवर मी आरोप केले की, भारतीय जनता पार्टीचे लोक माझ्यावर नाराज होतात, परंतु राज्यात ड्रग, पोर्शे कार सारख्या दुर्घटना वाढत आहेत. अशावेळी सत्तेमध्ये आहे त्यांना एक न्याय आणि सामान्य माणसाला एक न्याय आहे.

आता जी घटना घडली आहे. त्याचीही चौकशी झाली पाहिजे. हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजघटनेच्या नुसारच चालणार आहे. कोणाचीही मनमानी चालणार नाही. अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khadakwasla Dam Water Level : पुणेकरांची चिंता वाढली! खडकवासला धरणसाखळीत मागील वर्षाच्या तुलनेत 5.27 टीएमसी पाणी कमी, चारही धरणांत 23.05 टीएमसी साठा शिल्लक

Gokul Government Directors : अखेर 'त्या' अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी; गोकुळवर पाच शासकीय संचालक नियुक्तीचा मार्ग मोकळा, मतदानाचाही मिळाला अधिकार

IND vs NZ 2nd ODI Live : वेलिंग्टन वन डे सामन्याला विलंब का होतोय? मॅच सुरू व्हायची वेळ झाली, पण अजून टॉसही झालेला नाही; जाणून घ्या अपडेट्स

Gokul Chairman Election Controversy : 'जय-पराजय होतात, पण माझ्या मुलाबद्दल जे केलं त्याबद्दल फार खंत वाटते, ते जिव्हारी लागलंय'; हसन मुश्रीफांनी व्यक्त केलं दु:ख

Daily Horoscope : राशिभविष्य - शनिवारी ७ नोव्हेंबर २०२६

SCROLL FOR NEXT