Ramdas Athawale 
पुणे

मोदी IPL मधले कॅप्टन; मीही चांगला बॅट्समन : आठवले

सलील उरुणकर

पुणे : केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज मोदी सरकारच्या वतीने जोरदार बॅटिंग करत नरेंद्र मोदी हे आपयपीएल टीमचे कर्णधार असल्याचा दावा केला. तसेच आपण स्वतः चांगले फलंदाज असून, मोदी  हे २०१९ मध्ये पुन्हा सत्तेवर येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर मते व्यक्त केली. नरेंद्र मोदी हे कणखर पंतप्रधान आहेत.  काँग्रेस सरकारच्या काळात प्रलंबित असलेले प्रश्न मोदींनी मार्गी लावले. देशात जातियवाद जिवंत राहिला. यासाठी काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. काॅग्रेस २०१९ च्या निवडणुकीत १०० च्या पुढे जाणार नसल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

कोरेगाव भीमा येथील दंगल प्रकरणाविषयी बोलताना ते म्हणाले,`` संभाजी भिडे हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत. ते दोषी असतील तर त्यांना पकडा. त्यांच्या सहभागाविषयी गांभीर्याने तपास करा.``

बढत्यांमधील आरक्षणासाठी कायदा करण्याची केंद्र सरकारकडे मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक  कायद्याला धक्का लावण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नाही, असे मत व्यक्त करून गरज पडल्यास केंद्राने वटहुकूम काढावा, अशी मागणी त्यांनी केली.  धनगर समाजाला अनुसूचित जमातींप्रमाणे आरक्षण मिळावे, या मागणीला त्यांनी पाठिंबा दिला.

शिवसेना आणि भाजप एकत्र आले तर मी कुठूनही निवडून येऊ शकतो, असाही दावा त्यांनी केला. रिपब्लिकन ऐक्य हा समाजासाठी भावनेचा मुद्दा आहे. बिग बॉस` या टिव्ही रिअॅलिटी शोमध्ये जाण्यासाठी आता मला वेळ नाही. मीच बिग बॉस असल्याचा टोला त्यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Storage : 'कोयना' भरतंय, कृष्णेचाही वाढतोय विसर्ग..; धरण 88 टक्क्यांवर, 16 हजार 468 क्युसेक आवक, 13 हजार 894 क्युसेक विसर्ग

FDAला उच्च न्यायालयाने पुन्हा खडसावले, अ‍ॅमेझॉनच्या कारवाईवरून व्यक्त केला संताप

Karad Politics : नगराध्यक्षांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण! 680 कोटींच्या 'नेकलेस रोड'वरून भाजप-सत्ताधाऱ्यांमध्ये हायव्होल्टेज ड्रामा, वाटेगावकरांचा पलटवार

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिले

आमच्या लग्नात अचानक राष्ट्रगीत वाजलं आणि नाचणाऱ्यांचे हात... मृणाल दुसानिसने सांगितली लग्नातली गंमत; म्हणते-

SCROLL FOR NEXT