पिंपळे गुरव, ता.५ ः सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज यांची ७४० वी पुण्यतिथी नवी सांगवी येथे उत्साहात साजरी करण्यात आली. सुवर्णपुष्प आम्ही सांगवी-पिंपळे गुरवकर, पांचाळ सोनार समाज यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
पुण्यतिथी निमित्त कृष्णाई महिला भजनी मंडळ अध्यक्ष संगीता दीक्षित, ज्ञानदीप महिला भजनी मंडळ अध्यक्ष लता दीक्षित यांनी भजन सेवा दिली. टाळ मृदुंगाच्या गजरात संत नरहरी महाराजांची दुपारी बारा वाजता आरती करण्यात आली. यानंतर महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित समाज बांधवांच्या वतीने आरती करून पुष्पवृष्टी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरवातीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर नवनिर्वाचित नगरसेविका रवीना अंगोळकर, शकुंतला धराडे, पल्लवी जगताप, दीप्ती कांबळे, तृप्ती कांबळे, उज्वला ढोरे, ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली जगताप, हर्षल ढोरे, गणेश जगताप, संजय मराठे, यांचा समाज बांधवांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या प्रसंगी सोनार समाजातील कवी अनिल दीक्षित, युवा उद्योजक ऋतुजा महामुनी, डॉ. गणेश दीक्षित यांचा देखील सन्मान करण्यात आला.
महिलांसाठी ‘हेल्थ अवेअरनेस या आरोग्य विषयक शिबिरात उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. उमाकांत दीक्षित यांनी प्रास्ताविक तर विजय दीक्षित यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.