भोसरी, ता. ४ : श्री संत नरहरी सेवा संघ, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने दिघी येथील श्री संत नरहरी सोनार महाराज मंदिरात संत नरहरी महाराज जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यातील देव-देवतांच्या तसेच संतांच्या मूर्तींचा अभिषेक व महापूजा करण्यात आली. त्यानंतर दीपप्रज्वलन करून संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी संत नरहरी महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रिशा निघोजकर यांचे व्याख्यान झाले. श्रीराम वारकरी शिक्षण संस्था, आरेवाडी येथील बालकीर्तनकार स्वरांगी देसाई यांनी कीर्तनसेवा केली. त्यांना पखवाजाची साथ महेश महाराज लेंभे आणि गायनाची साथ सोनाली आटोळे यांनी दिली. यावेळी पुणे पोलिस सन्मान पदक विजेत्या विनिता चांदेकर आणि गुणवंत विद्यार्थी वरद फाकटकर यांचा सन्मान करण्यात आला.
दरम्यान, माजी अध्यक्ष शशी निघोजकर, अपर्णा घबाडे, अपर्णा पूर्णानंद, अरविंद खोल्लम, शरद बेल्हेकर, भालचंद्र बेल्हेकर, डॉ. शिरीष देवकुळे, राजेंद्र खोल्लम, शांताराम खोल्लम, सुरेश फाकटकर, दिलीप चाकणकर, चंद्रकुमार घोडेकर, मच्छिंद्र खोल्लम आदी उपस्थित होते. सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी श्री संत नरहरी सेवा संघाचे अध्यक्ष संजय बेदरकर, सचिव दत्तात्रय चांदेकर, उपाध्यक्ष दिलीप फाकटकर, रवींद्र बेल्हेकर, वैशाली खोल्लम, दिलीप खोलमकर, अरुण घबाडे, राहुल खोल्लम, मंजूषा बेल्हेकर तसेच विश्वस्त, सल्लागार मंडळ आणि समाजबांधवांनी परिश्रम घेतले. उपाध्यक्ष दिलीप फाकटकर यांनी प्रास्ताविक केले. प्रीती निघोजकर व दत्तात्रय चांदेकर यांनी सूत्रसंचालन केले. अध्यक्ष बेदरकर यांनी आभार मानले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.