narhe fire 
पुणे

नऱ्हेमधील चार कंपन्या आगीच्या भक्ष्यस्थानी, दीड कोटींपेक्षा जास्त आर्थिक नुकसान

सकाळवृत्तसेवा

धायरी : नऱ्हे येथील अभिनव कॉलेज रस्ता येथील फुगे आणि कागदी डेकोरेशन तयार करणाऱ्या कारखान्याला सकाळी ११ च्या सुमारास आग लागली होती. पुणे मनपा अग्निशमन केंद्राचे जवान आणि PMRDA अग्निशमन केंद्राचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. यांसाठी आठ फायर गाड्याच्या मदतीने आग विझवण्यात आली. नऱ्हे - धायरी येथील अभिनव कॉलेज परिसरातील असणाऱ्या गोडाऊनमधील चार  कारखान्याला आग लागली. यामधील फुगे आणि कागदी डेकोरेशन तयार करणाऱ्या कारखान्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच लागून असणाऱ्या कंपनीचे साहित्य तयार करणाऱ्या गोडाऊनला देखील आग लागली आहे. गादी कारखाना देखील यामध्ये अक्षरशः जाळून खाक झाला आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कारखान्याचे आर्थिक नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झाले.

जवळपास दीड कोटींपेक्षा जास्त आर्थिक नुकसान झाले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान पोहचले असून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत होते. पीएमआरडी आणि पुणे मनपा अग्निशमन केंद्राच्या आठ आगीचे बंब आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते. अखेर तीन तासांनी आगीवर नियंत्रण आणण्यास यश मिळाले. 

नऱ्हे धायरी येथील अभिनव कॉलेज  रस्ता  जवळील १) क्रीएटिव्ह वूड सन्स एनसी आर्ट २) मल्हार टेक्नोलॉजी ३) ब्लू टेक टेक्नोलॉजी ४) शिव स्टील फर्नीचर या  ४ कंपन्यांना आग लागलेली होती. पीएमआरडीए अग्निशमन दल व पुणे अग्निशमन दल यांच्या जवानांनी आग पूर्ण विझवली असून बाजूला असलेल्या गोडाऊनला आगीपासून वाचवण्यात आले आहे. केंद्र अधिकारी सुजित पाटील, उपस्थानक अधिकारी विजय महाजन, पालिकेचे केंद्र अधिकारी प्रभाकर उमरटकर व कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. तसेच सिंहगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, पोलीस उपनिरीक्षक दिपक खेडेकर, नितीन जाधव  व पोलीस कर्मचारी जीवाची पर्वा न करता आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करत होते.आगीवर कोणत्याही जीवितहानी झालेली नाही. परिसरात बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून सिंहगड रस्ता पोलीस गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अक्षरशः नाकीनऊ आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT