नऱ्हे गावामधील ओढ्यालगत सिमाभिंत बांधण्यासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर Sakal
पुणे

Pune News : नऱ्हे गावामधील ओढ्यालगत सिमाभिंत बांधण्यासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर...

भाजप- राष्ट्रवादीत श्रेयवादाची लढाई जोमाने

विठ्ठल तांबे

धायरी : नऱ्हेगाव येथील मानाजीनगर परिसरात ओढ्यालगत सिमाभिंत ,रस्ता, मल्लनि: सारणवाहिनीसाठी निधी मंजूर झाला असून. आमदार भीमराव तापकीर यांनी तत्काळ भूमिपूजन देखील केले. निधी कुणी मंजूर करून आणला, या कामासाठी श्रेय घेणे सुरु असून बॅनरबाजी पाहायला मिळत आहे.

हा निधी महापालिकेने मंजूर केला असला तरी भाजप- राष्ट्रवादीत श्रेयवादाची लढाई जोमाने सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. खरे श्रेय कोणाचे या पेक्षा दोन बळींच्या स्मरणार्थ सिमाभिंत बांधली जाणे महत्त्वाचे आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे.

२५ सप्टेंबर २०१९ रोजी नऱ्हे येथील मानाजीनगर भागातील साईपुरम सोसायटीत नाल्याचे पाणी शिरले. सोसायटीतून पाण्याचा लोंढा बाहेर जाण्यासाठी मार्ग काढत असताना अचानक सीमाभिंत कोसळली. सहाजण नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. चारजण पाण्यातून सहीसलामत बाहेर आले मात्र दोन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

त्यानंतर नऱ्हे येथील भाजप व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे तसेच विद्यमान आमदार व खासदार यांच्याकडे संबंधित कामासाठी निधी उपलब्ध होऊन काम मार्गी लागावे, यासाठी पाठपुरावा केला.

त्यानंतर मे २०२३ रोजी महापालिकेच्या मल्लनि:सारण विभागाने अंदाजपत्रकात १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यासाठी प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविला. मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात आता करण्यात येणार असल्याने दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार बॅनरबाजी केली. त्यामुळे नऱ्हे विद्रुप करण्याचे काम होत असल्याची टीका काही सुज्ञ नागरिकांनी केली.

दोन नागरिकांचा बळी जाऊनही श्रेय घेण्यासाठी धडपड

२०१९ मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे साईपुरम सोसायटीतलगत असणाऱ्या ओढ्याची सीमाभिंत वाहून गेली. यात दोन नागरिकांचा बळी गेला. भविष्यात दुर्घटना होऊ नये, यासाठी सीमाभिंत होणे गरजेचे होते. सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व नागरिकांनी पाठपुरावा केला. त्यामुळे महापालिकेच्या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली.

मात्र निधी महापालिकेचा असूनही भूमिपूजन आमदारांच्या हस्ते झाल्याने काही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.  दोन नागरिकांचा बळी जाऊनही श्रेय घेण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या बॅनरबाजीमुळे राजकारण्यांविषयी नकारात्मक भावना आहेत.

श्रयेवादमध्ये विषय येत नसून ,या कामासाठी संपूर्ण लढाई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे. नाला दुरुस्ती, सीमा भिंत तसेच नाल्यालगतचा रस्ता या एक कोटी निधी मध्ये अंतर्भुत आहे. पुरामुळे मृत्यु पावलेले निष्पाप जीव गेले यांना हीच खारी श्रद्धांजली.भविष्यात याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शासन दरबारी ही लढाई लढलो व जिंकलो यात आम्हाला राजकारण करायचे नाही.

- भूपेंद्र मोरे, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, खडकवासला मतदारसंघ

- मुळात या कामासाठी खासदार सुप्रिया सुळे, महापालिका आयुक्त यांच्याबरोबर पदाधिकारी व नागरिकांची संयुक्त बैठक झाली होती. खासदार सुळे यांनी याबाबत महापालिकेला पत्र देखील दिले. तसेच आम्ही याबाबत महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. निधी मंजूर झाला हे कुणा एकट्याचे श्रेय नाही.

- पोपटराव खेडेकर, माजी सरपंच, नऱ्हेगाव

- आम्ही महापालिकेकडे तसेच आमदार भीमराव तापकीर यांच्याकडे पत्रव्यवहार तसेच प्रत्यक्षात सुद्धा सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळेच महापालिकेने निधी उपलब्ध करुन दिला आहे.

- सुशांत कुटे, माजी उपसरपंच नऱ्हे

- २०२३-२४ आर्थिक तरतुदीमध्ये १ कोटी उपलब्धतेनुसर प्रशासकीय मान्यता देण्यात आली. तीन दिवसांपूर्वी वर्कऑर्डर निघाली असून प्रत्यक्षात गुरुवारपासून कामास सुरुवात होणार आहे. यामध्ये सिमभिंत व शेजारील रस्ता, मल्लनि:सारण वहिनी करण्यात येणार आहे.

- निशिकांत छापेकर, कनिष्ठ अभियंता, मल्लनि:सारण विभाग, मनपा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

C. P. Radhakrishnan: सर्वसामान्यांना उच्चपदी बसविणे ही लोकशाहीची ताकद; राधाकृष्णन यांच्याविषयी पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्गार

Winter Tourism Spots: थंडीत फिरायला जायचं प्लॅन करताय? "या" 5 निसर्गरम्य ठिकाणांना द्या भेट

Latest Marathi News Live Update : पुण्यात दुपारी 1.30 वाजेपर्यंत 35% पेक्षा जास्त मतदान

Pimpri News : पीएमपी चालक-वाहक बनले देवदूत; बसमध्ये हृदयविकाराचा झटका आलेला प्रवासी बचावला

Prithvi Shaw : ११ चौकार, १ षटकार! पृथ्वीच्या आक्रमक खेळीमुळे वैभव सुर्यवंशीचे विश्वविक्रमी शतक व्यर्थ; महाराष्ट्राचा बिहारवर विजय

SCROLL FOR NEXT