घोडेगाव, ता. १८ : नारोडी (ता. आंबेगाव) येथील नारोडी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी सुवर्णा दत्तात्रेय हुले तर उपाध्यक्षपदी मधुकर डगळे यांची एकमताने निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विवेक वाघमारे तर साहाय्यक म्हणून संजय घोडेकर यांनी काम पाहिले. विलास हुले व सोमनाथ जम्बूकर यांनी राजीनामा दिल्यानंतर या जागेवर ही निवडणूक घेण्यात आली.
यावेळी जागा रिक्त असलेल्या संचालकपदी बाबूराव पिंगळे यांची तर स्वीकृत सदस्यपदी भरत पिंगळे यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर सर्वांचा सत्कार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे सभापती नीलेश थोरात, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष नवनाथ हुले, दगडू पिंगळे, सोमनाथ काळे उपस्थित होते.
05146, 05145
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.