पुणे

केंद्राच्या शिष्टमंडळाकडून नाशिकच्या शेती, उद्योगांची पाहणी

CD

केंद्राच्या शिष्टमंडळाकडून
शेती, उद्योगांची पाहणी

३१ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अभ्यास दौरा

नाशिक : केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही.अनंत नागेश्वरन यांच्या नेतृत्वाखालील ३१ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने नाशिक जिल्ह्याचा अभ्यास दौरा केला. या दौऱ्यात आधुनिक शेती, कृषी प्रक्रिया, निर्यात, औषधनिर्मिती, अभियांत्रिकी उद्योग आणि पारंपरिक व्यवसायांची पाहणी करण्यात आली.

दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात सह्याद्री फार्म्सला भेट देऊन द्राक्ष, केळी व डाळिंब निर्यात व्यवस्था, पॅकहाऊस, प्रक्रिया केंद्रे आणि मूल्यवर्धन साखळीची माहिती घेण्यात आली. हवामान बदलाला तोंड देणारे पीकवाण, ड्रोन तंत्रज्ञान, कृषी सौर ऊर्जा आणि रोबोटिक्सच्या वापराची माहितीही अधिकाऱ्यांनी घेतली.

सावरगाव येथे शेतकरी गटाशी संवाद साधून शेतीतील संधी व आव्हानांचा आढावा घेतला. सगीर गावातील कुक्कुटपालन व्यवसायाचीही पाहणी केली. अक्राळे-दिंडोरी येथील रिलायन्स लाइफ सायन्सेसमध्ये जैवऔषधनिर्मिती व प्लाझ्मा उत्पादन प्रक्रिया समजून घेतली. सातपूर औद्योगिक वसाहतीतील टीडीके इलेक्ट्रॉनिक्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा येथे आधुनिक उत्पादन प्रणालीची माहिती घेतली. सुला व्हाइनयार्ड्समध्ये वाइननिर्मिती व कृषी पर्यटनाचा अभ्यास केला.

येवला येथील कापसे पैठणी केंद्रात पारंपरिक विणकाम, महिला रोजगार आणि निर्यातीच्या संधींबाबत चर्चा केली. कुंभमेळा आयुक्त कार्यालयात आगामी कुंभमेळ्याच्या नियोजनाची, तर एबीबी कंपनीत वीज उपकरणे निर्मिती व वितरण यंत्रणेच्या आधुनिकीकरणाची माहिती घेतली. या दौऱ्यामुळे नाशिकच्या कृषी, औद्योगिक आणि पारंपरिक व्यवसायांमधील आर्थिक संधींचा केंद्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष अभ्यास करता आला. दौऱ्याचे समन्वय जिल्हाधिकारी कार्यालयाने केले, तर सह्याद्री फार्म्सने नियोजनात सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Spine Surgery: जन्माची वाट न पाहता आईच्या गर्भातच बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया; AIIMSच्या डॉक्टरांनी रचला इतिहास

Gold-Silver Crash: सोनं-चांदीचे भाव कोसळले! लग्नसराईआधी वर्षातील सर्वात स्वस्त दर; नेमकं कारण काय? आणखी स्वस्त होणार?

ट्रेनिंगदरम्यान जुळले प्रेमाचे धागे, IAS-IPS अधिकारी अडकले विवाहबंधनात; विवेक आर्य आणि अदिती सिंग यांची लव्हस्टोरी चर्चेत

Latest Marathi News Update : राज्यातील दुष्काळमुक्तीसाठी सरकारचा व्यापक कृती आराखडा; खाणींतील पाणी शेतीसाठी वापरणार, १५ लाख शेतकऱ्यांना 'फार्मर आयडी'चा लाभ - महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

FSSAI ने आणला दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी खास लोगो; ग्राहकांना काय होणार फायदा? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT