नाशिकमध्ये हिरवी मिरची
आवकेत घट, दरात सुधारणा
----
मुकुंद पिंगळे : ॲग्रोवन वृत्तसेवा
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ३ ते ९ ऑक्टोबर दरम्यान सप्ताहात हिरवी मिरचीची आवक १२५ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रति क्विंटल किमान ५५००, कमाल ७१०० तर सरासरी ६५०० रुपये दर मिळाला. त्यामागील सप्ताहात आवक ३७६ क्विंटल झाली होती. त्यास सरासरी ३८५० रुपये दर होता. तर या सप्ताहात क्विंटलमागे २६५० रुपयांची वाढ दिसून आली.
मागील सप्ताहात तुलनेत फळभाज्या व पालेभाज्यांची आवक वाढली आहे. आवक व मागणीनुसार दरात चढउतार दिसून आले. वालपापडी घेवड्याची आवक १२३५७ क्विंटल झाली. आवक वाढूनही मागणी असल्याने वालपापडीला प्रति क्विंटल किमान ५००० कमाल ७००० तर सरासरी ६३२५ रुपये,तर घेवड्याला किमान २०००, कमाल ४००० तर सरासरी ३००० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.
उन्हाळ कांद्याची आवक ८२११ क्विंटल झाली. त्यास प्रति क्विंटल १८०० ते ३८०० तर सरासरी दर ३००० रुपये राहिला. बटाट्याची आवक वाढली असून ती ९९५५ क्विंटल झाली. त्यास प्रति क्विंटल ७०० ते १३०० तर सरासरी दर १००० रुपये राहिला. लसणाची आवक १०१ क्विंटल झाली. त्यास प्रति क्विंटल किमान ७५००, कमाल १८००० तर सरासरी १४००० रुपये दर मिळाला.
फळभाज्यामध्ये टोमॅटोला ५० ते ३२१ तर सरासरी १९०, वांगी २०० ते २५० तर सरासरी २७५, फ्लॉवर ५० ते १९० सरासरी १४० रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. तर कोबीला ४० ते १०० तर सरासरी ८० रुपये असे दर प्रति २० किलोस मिळाले. ढोबळी मिरचीला ३५० ते ५५० तर सरासरी दर ४७५ रुपये असे दर प्रति ९ किलोस मिळाले.
वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये भोपळा १०० ते ३७५ तर सरासरी २२५, कारले १२५ ते २५० तर सरासरी १४०, दोडका २०० ते ३५० तर सरासरी दर २८० रुपये, गिलके १०० ते २५० तर सरासरी १७५, काकडी ३०० ते ५२५ तर सरासरी दर ४५० रुपये असे प्रति क्रेट दर मिळाले.
फळांमध्ये केळीची आवक २००० क्विंटल झाली. तिला प्रति क्विंटल ७०० ते १५०० तर सरासरी दर १००० रुपये मिळाला. डाळिंबाची आवक २६७६ क्विंटल झाली. आवक कमी झाली असून मृदुला वाणास ४०० ते २०००० तर सरासरी १५००० रुपये दर मिळाला. दरात वाढ दिसून आली.
चौकट ----
भाजीपाला प्रति १०० जुड्यांचा दर
पालेभाजी...किमान...कमाल...सरासरी
कोथिंबीर...२,५००...७,७००...३,६५०
मेथी...२,५००...७,०००...४,०००
शेपू...२,०००...५,८००...४,३५०
कांदापात...२,१००...६,०००...३,७५०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.