पुणे

नाशिक परिक्रमा मार्गासाठी थेट खरेदीद्वारे भूसंपादन

CD

नाशिक परिक्रमा मार्गासाठी थेट खरेदीद्वारे भूसंपादन ः आयुष प्रसाद
--
भूधारकांनी १२ ऑगस्टपर्यंत ‘केवायसी’ पूर्ण करण्याचे आवाहन
--

ॲग्रोवन वृत्तसेवा

नाशिक : नाशिक परिक्रमा मार्ग या पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीचे थेट खरेदीद्वारे भूसंपादन करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत सुरू आहे. प्रकल्पाच्या आखणीत समाविष्ट गावांतील भूधारकांनी तातडीने ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करून थेट खरेदीद्वारे भूसंपादनासाठी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

नाशिक परिक्रमा मार्गाच्या आखणीत दिंडोरी तालुक्यातील वरवंडी, तसेच नाशिक तालुक्यातील जलालपूर, महादेवपूर, गोवर्धन, आंबेबहुला, मुंगसरे, मातोरी, चांदशी, आडगाव, मखमलाबाद, पाथर्डी, पिंपळगाव बहुला, पिंपळगाव खांब, देवळाली, वडनेर दुमाला, विहितगाव, सारोळे, विंचूरगवळी, माडसांगवी, बेलगाव ढगा आणि पंचक या गावांचा समावेश आहे.

या गावांतील संबंधित भूधारकांनी महामंडळाच्या आवाहनानुसार ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करून थेट खरेदीद्वारे भूसंपादनासाठी नोंदणी करावी. सामाईक गट क्रमांक असल्यास आवश्यकतेनुसार संयुक्त बँक खाते उघडावे. भूसंपादनाचा मोबदला संबंधित संयुक्त बँक खात्यात वर्ग करून घेण्याची कार्यवाही करावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

थेट खरेदीद्वारे भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी भूधारकांनी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या दुसरा मजला, जुनी जिल्हा परिषद इमारत, नाशिक येथील कार्यालयात १२ ऑगस्टपर्यंत संपर्क साधावा.

अंतिम निवाड्यापर्यंतच थेट खरेदी

प्रत्येक गावाचा प्रारूप अंतिम निवाडा जाहीर होईपर्यंतच महामंडळामार्फत थेट खरेदीद्वारे भूसंपादन केले जाणार आहे. त्यानंतर थेट खरेदीची प्रक्रिया राबविली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. त्यामुळे संबंधित भूधारकांनी आवश्यक कागदपत्रांसह विहित मुदतीत ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रसाद यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest Shivaji Park : अभिजित दिपके मुंबई पोलिसांच्या रडारवर? शिवाजी पार्कवरील आंदोलन बेकायदेशीर?; CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

Latest Marathi News Live Update : दिवसभरात काय घडलं? देशविदेशातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

MPSC Student Agitation Issue : एमपीएससी आंदोलनातील फूट; शिष्टमंडळाच्या परस्पर निर्णयाने विद्यार्थ्यांमध्ये संताप

Gangapur News : गंगापूर तालुक्यात खरीप हंगामच्या पंचनाम्याला वेग; दोन दिवसात १६ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्राचा पंचनामा पूर्ण

Satara District Bank Election : भाजप, राष्ट्रवादीने वाढवले उंडाळकरांचे टेन्शन! बाळासाहेब पाटलांसह भाजपचे तीन दिग्गज मैदानात; उमेदवारीचा दावेदार कोण याचीच उत्सुकता

SCROLL FOR NEXT